Agriculture news in Marathi Revenue of Rs 2.5 crore from sale of 'Biomix' | Agrowon

‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला अडीच कोटींचा महसूल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागातर्फे उत्पादित बायोमिक्स हे उपयुक्त बुरशींचे मिश्रण राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. यंदाच्या हंगामात सोमवार (ता. १९) पर्यंत १७० टन बायोमिक्सची विक्री झाली असून त्यातून विद्यापीठाला २ कोटी ६० लाख रुपये एवढा महसूल प्राप्त झाला आहे.

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागातर्फे उत्पादित बायोमिक्स हे उपयुक्त बुरशींचे मिश्रण राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. यंदाच्या हंगामात सोमवार (ता. १९) पर्यंत १७० टन बायोमिक्सची विक्री झाली असून त्यातून विद्यापीठाला २ कोटी ६० लाख रुपये एवढा महसूल प्राप्त झाला आहे.

शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन द्रवरूप ट्रायकोडर्मा (माऊफंगस)चे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात कृषी विद्यापीठाचे बियाणे, रोपटी, जैविक खते आदी उत्पादने शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने खरेदी करता यावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी दिली.

बायोमिक्‍स विक्री लक्षपूर्ती सोहळा आणि द्रवरूप ट्रायकोडर्मा माऊफंग विक्री उद्घाटन सोमवारी (ता. १९) दुपारी करण्यात आले. यावेळी डॉ. ढवण अध्यक्षस्थानी होते. संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. सय्यद इस्‍माईल, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ. डी. एन. धुतराज, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कल्याण आपेट आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. ढवण म्‍हणाले की, यावर्षी लॉकडाऊनच्या काळातही शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे एप्रिल ते आजपर्यंत विद्यापीठाच्या बॉयोमिक्‍स विक्रमी विक्री झाली. विद्यापीठाच्‍या इतिहासात केवळ एकाच निविष्‍ठापासून मोठा महसुल प्रथमच प्राप्‍त झाला आहे.

यावेळी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, डॉ. कल्‍याण आपेट, डॉ. मिनाक्षी पाटील लिखित अळिंबी लागवड तंत्रज्ञान पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले. सूत्रसंचालन डॉ. पाटील यांनी केले. तर डॉ. अंबाडकर यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्य डॉ. अरविंद सावते आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी उपस्थित होते.


इतर अॅग्रो विशेष
मूळ दुखण्यावर इलाज कधी?सरकार कितीही सांगत असले की आम्ही शेतकऱ्यांना...
‘सूक्ष्म उद्योग’ घडवतील मोठा बदल पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन...
केंद्र सरकारचा समितीचा प्रस्ताव...नवी दिल्ली : विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही...
यंदा हिवाळ्यात गारठा जरा अधिकच राहणारपुणे : चालू वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा...
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना...पुणे : “राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला...
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;...पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...
नव्या कायद्यामुळेच मिळाले पैसे;...धुळे : कृषी व पणन सुधारणा कायदा अस्तित्वात...
शेतकरी संघटनांचा उद्या राज्यव्यापी...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या...
कापूस खरेदीतील कटती अयोग्य; सीसीआय...जळगाव : कापूस महामंडळ (सीसीआय) शेतकऱ्यांसाठी काम...
राज्यात ‘पणन’ची दहा हजार क्विंटल कापूस...नागपूर : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी...
मराठवाड्यात कुठे मोहर, तर कुठे...औरंगाबाद : मराठवाड्यातील केसर आंब्याच्या झाडाला...
विविध तंत्रांचा वापर सांगणारी लंबे...बुलडाणा जिल्ह्यातील माळखेड येथील गणेश लंबे यांनी...
संवादातून मिटेल संघर्षकृषी व पणन सुधारणांबाबतच्या तीन नव्या...
हमीभाव ः वादीवाल्यांचा सापळालातूरला पुर्वी वादीवाले लुटारु टोळके असायचे. ते...
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...