परभणी जिल्ह्यातील खरिपाची ६१.८४ ही हंगामी पैसेवारी

परभणी जिल्ह्यातील खरिपाची ६१.८४ ही हंगामी पैसेवारी
परभणी जिल्ह्यातील खरिपाची ६१.८४ ही हंगामी पैसेवारी

परभणी : जिल्ह्यातील पैसेवारीसाठी पात्र असलेल्या सर्व ८४८ गावांतील यंदाच्या (२०१९-२०) खरीप पिकांची हंगामी (नजरी) पैसेवारी सरासरी ६१.८४ पैसे आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी (ता. ३०) यंदाच्या खरिपाची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात एकूण ८५२ गावे असून, त्यापैकी बलसा (ता. परभणी) या गावाचे कृषिक्षेत्र कृषी विद्यापीठासाठी, तर करडखेडा (ता. सेलू), चौधरणी खु., लिंबाळा (ता. जिंतूर) या चार गावांचे संपूर्ण कृषी क्षेत्र धरणासाठी संपादित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ८४८ गावे पैसेवारीसाठी पात्र आहेत. 

जिल्ह्यातील लागवडीयोग्य ५ लाख ५८ हजार ७२९.९५ हेक्टर क्षेत्रापैकी यंदा हंगामात ५ लाख ३४ हजार ३१८ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली. २४ हजार ४११.६० हेक्टर एवढे क्षेत्र पडीक राहिले. जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरिपाची हंगामी पैसेवारी सोमवारी (ता. ३०) जाहीर केली आहे.

पैसेवारीसाठी पात्र सर्व ८४८ गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त म्हणजेच सरासरी ६१.८४ पैसे आली. गतवर्षी (२०१८-१९) ती सरासरी ५४.२४ पैसे आली होती.

तालुकानिहाय गावे, हंगामी पैसेवारी

तालुका गावे  पैसेवारी
परभणी १३१ ६१.२५
जिंतूर १६९  ५९.६०
सेलू ९४ ५५.००
मानवत  ५४ ६५.९९
पाथरी ५८  ७२.१७
सोनपेठ ६०   ५५.९४
गंगाखेड १०५ ६१.७५
पालम ८२ ६१.६७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com