द्रवरूप जिवाणू संवर्धकांच्या विक्रीतून ६३ लाखांचा महसूल

द्रवरूप जिवाणू संवर्धकांच्या विक्रीतून ६३ लाखांचा महसूल
द्रवरूप जिवाणू संवर्धकांच्या विक्रीतून ६३ लाखांचा महसूल

नांदेड : कृषी विभागाच्या नांदेड आणि परभणी येथील जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळांमध्ये यंदाच्या (२०१९-२०) खरिप हंगामामध्ये १४ हजार ९२० लिटर द्रवरुप जिवाणू संघाचे (द्रवरुप जिवाणू संवर्धक खते) उत्पादन घेण्यात आले. त्यांच्या विक्रीतून एकूण ६३ लाख ६१ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना बीजप्रक्रिया करण्यासाठी विविध प्रकारचे द्रवरुप जीवाणू संघ उपलब्ध आहेत,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

कृषी विभागाच्या नांदेड येथील धनेगाव मध्यवर्ती रोपवाटिका आणि परभणी येथील पाथरी रस्त्यावरील जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेत अद्ययावत सयंत्राव्दारे रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर या जिवाणूंच्या द्रवरुप जीवाणू संघाची निर्मिती केली जाते. त्याचप्रमाणे यंदा गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्डची निर्मिती करण्यात आली होती. यंदाच्या खरिप हंगामात परभणी येथील प्रयोगशाळेत सोयाबीन गटातील पिकांसाठी रायझोबियम, पीएसबी, केएमबी या चवळी गटातील तूर, मूग, उडदासाठी रायझोबियम, पीएसबी, केएमबी, तर तृणधान्य ज्वारी, बाजरी आदी पिकांसाठी अॅझोटॅबॅक्टर, पीएसबी, केएमबी या घटकांच्या एकूण ६ हजार ३३० लिटर संवर्धकांची निर्मिती करण्यात आली.

या ठिकाणाहून परभणी, हिंगोली, सांगली जिल्ह्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांर्गंत संवर्धकांचा पुरवठा करण्यात येतो. शेतकऱ्यांना देखील विक्री केली जाते.  यंदा संवर्धकांच्या विक्रीतून २३ लाख रुपयाचा महसूल प्रयोगशाळेत प्राप्त झाला. 

गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी यंदा २०४ ट्रायकोकार्डची निर्मिती करण्यात आली. प्रयोगशाळेचे तंत्र अधिकारी बी.आर.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मधुसुदन राऊत, पेशकार आदींनी रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू आदी पिकांसाठी संवर्धकाचे उत्पादन सुरु केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com