महसूल कर्मचारी बेमुदत संपावर; कामकाज ठप्प

महसूल कर्मचारी बेमुदत संपावर; कामकाज ठप्प
महसूल कर्मचारी बेमुदत संपावर; कामकाज ठप्प

नांदेड : महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नांदेड, परभणी जिल्ह्यांतील महसूल विभागातील लिपिक, अव्वल कारकून, पदोन्नत नायब तहसीलदार, कोतवाल आदी अधिकारी-कर्मचारी गुरुवार (ता. ५) पासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे.

महसूल कर्मचारी संघटनेने ही माहिती दिली. प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी संघटनेने यापूर्वीही आंदोलन केले आहे. परंतु अतिवृष्टी-महापूर अशा आपत्ती परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन संघटनेने अनेकदा आंदोलन स्थगित केले होते. 

या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे  शनिवारी (ता. ३१) एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. परंतु शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे लिपिक, अव्वल कारकून, पदोन्नत नायब तहसीलदार, कोतवाल आदी कर्मचाऱ्यांनी गुरुवार (ता. ५) पासून बेमुदत संप पुकारला आहे, असे राज्य महसूल संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण नरमवार, नांदेड जिल्हाध्यक्ष कुणाल जगताप, सचिव माधव डांगे, परभणी जिल्हा अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com