खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम प्रभावीपणे राबवा ः मुख्यमंत्री

अकोला जिल्हा आढावा बैठक
अकोला जिल्हा आढावा बैठक

अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण असल्याने या भागातील जमीन सुधारणेसाठी शेततळे वरदान ठरणार आहेत. यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. या दोन्ही योजनांचे एकत्रिकीकरण करून भूसुधारणा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विधान भवनातील मंत्री परिषदेच्या सभागृहात नुकतीच अकोला जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की शेततळी आणि धडक सिंचन विहिरींची कामे जलदगतीने पूर्ण करण्याची गरज आहे. धरणाच्या सिंचन क्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचत नसल्यास संबंधित गावांचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत करावा. आवश्यकतेनुसार जलसंधारणाची कामे योग्य योजनेतून पूर्ण करावीत. ही कामे करताना एकत्रित आराखडा तयार करून पूर्ण करावीत. जलसंधारणाची कामे वेगाने होण्यासाठी भारतीय जैन संघटनेची मदत घेऊन ही कामे २०१९ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी देणे महत्त्वाचे आहे. ही कामे कंत्राटदाराकडून वेळेत पूर्ण करून घ्यावीत. कामे प्रलंबित ठेवणाऱ्या कंत्राटदारांकडून कामे काढून त्यांना काळ्या यादीत टाकावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

अकोला जिल्ह्यातील नेरधामणा प्रकल्पासह अपूर्ण प्रकल्पांची कामे जलद गतीने पूर्ण करावीत. अकोट आणि तेल्हारा तालुक्यांतील १८१ गावांसाठी असणारी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबतची कार्यवाही जलद गतीने पूर्ण करावी. मोर्णा नदीच्या विकासासाठी राज्याने मंजूर केलेला निधी टप्प्याटप्प्याने देण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com