agriculture news in marathi, review meeting on drought situation, mumbai, maharashtra | Agrowon

कोरड्या पात्रातील गाळ शेतजमिनींसाठी वापरा : मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

मुंबई  ः सध्या दुष्काळी स्थितीमुळे अनेक बंधारे, तलाव तसेच प्रकल्पांतील पाणी खोल गेले आहे. अशा परिस्थितीत कोरड्या पात्रातील गाळ हा ''गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार'' योजनेअंतर्गत काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. पाऊस सुरू होण्यापूर्वी शक्यतो मे महिन्यातच याबाबतीत गतीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले.

मुंबई  ः सध्या दुष्काळी स्थितीमुळे अनेक बंधारे, तलाव तसेच प्रकल्पांतील पाणी खोल गेले आहे. अशा परिस्थितीत कोरड्या पात्रातील गाळ हा ''गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार'' योजनेअंतर्गत काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. पाऊस सुरू होण्यापूर्वी शक्यतो मे महिन्यातच याबाबतीत गतीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ''ऑडीओ ब्रीज सिस्टम''द्वारे सोमवारी पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर तालुक्यांमधील सुमारे ३० सरपंचांशी त्यांनी या वेळी चर्चा केली.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, की पुणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब ४८ तासांच्या आत निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. तहसीलदारांनी गावातील २०१८ ची लोकसंख्या आणि जनावरांची संख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा होईल याची दक्षता घ्यावी. गावामध्ये पाणी आहे, पण वाड्या वस्त्यांवर पाणी नाही, असा मुद्दा दौंड तालुक्यातील एका महिला सरपंचांनी मांडला. त्याची दखल घेऊन आवश्यकतेनुसार वाड्या वस्त्यांवरही लोकसंख्येप्रमाणे तातडीने टँकर सुरू करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील एका गावच्या सरपंचांनी रस्त्याच्या कामात पाण्याची टाकी येत असल्याने ती नव्याने बांधून मिळावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेत नव्या जागी पाण्याची टाकी बांधून द्यावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनास केल्या.

बारामती तालुक्यातील सरपंचांनी चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी केली. उपसमितीसमोर हा विषय ठेवून व्यवहार्यता तपासून याबाबत नक्की निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले. बारामतीतील दुसऱ्या एका सरपंचांनी १७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मांडला. स्रोतामध्ये फक्त १५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे त्यांनी सांगितले. या गावांच्या पाणीपुरवठ्याची काळजी घेण्याबरोबरच जुनी पाइपलाइन स्वच्छ आणि दुरुस्त करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.

इतर ताज्या घडामोडी
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...