agriculture news in marathi, review meeting on drought situation, nagar, maharashtra | Agrowon

गावे, वाड्यावस्त्यांना टॅंकरद्वारे नियमित पाणीपुरवठा व्हावा : प्रा. राम शिंदे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

जिल्ह्यातील चारा छावण्यांमधील जनावरांची १५ मे पासून संगणकीय पद्धतीने नोंद करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनीने छावणीचालकांना अद्यापपर्यंत टँग पुरविलेले नाहीत. जिल्हा प्रशासनाने संबंधित कंपनीला याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात.
- प्रा. राम शिंदे, पालकमंत्री

नगर  : जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने दुष्‍काळी स्थिती जाहीर करण्यात आली आहे. विविध गावे आणि वाड्यावस्त्यांवर टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा. ठरवून दिलेल्या खेपा होतील याकडे यंत्रणांनी लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिल्या.  

जिल्हा परिषदेत सोमवारी (ता. १३) पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी टंचाई आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील या वेळी उपस्थित होते. 

प्रा. शिंदे म्हणाले, की पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉन्फरन्सद्वारे घेतला. त्यानंतर या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, येणाऱ्या अडचणी, गावांची मागणी, विशेषतः चारा छावणी, टँकर्स, नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, बुडकी खोदणे, विहिरी खोल करणे व गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण, प्रगतिपथावरील नळपाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे आणि तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे,  मागेल त्याला काम याप्रमाणे रोहयोच्या कामांचे शेल्फ तयार करणे आदी बाबी महत्त्वाच्या आहेत.  

जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. प्रशासनाने यापूर्वीच दुष्काळ निवारण कामे करण्यासाठी आराखडा मंजूर केला आहे. या कृती आराखड्यातील हाती घेण्यात आलेल्या कामांचा तपशीलवार आढावा विविध यंत्रणांकडून त्यांनी घेतला. जिल्ह्यात सध्या बाराशे कामे रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असून बारा हजारांवर मजुरांची या कामांवर उपस्थिती आहे.

सध्या ग्रामपंचायतींमार्फत सुरू असणाऱ्या कामांवर ५ हजार ५४७ मजूर उपस्थिती असून यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या कामांवर ५ हजार ७०९ मजूर उपस्थिती आहे.जिल्ह्यात सध्या ५०३ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून ४९३ चारा छावण्या सुरू आहेत. छावणीचालकांच्या देयकांना जीएसटी लागणार नसल्याचे यापूर्वीच राज्य शासनाने स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.आतापर्यंत २३ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम छावणीचालकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून दुष्काळ बाधित शेतकऱ्यांसाठी आलेले ४०० कोटी रुपयांचे अनुदान ६ लाख ३६ हजार ७९० शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.  
 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...