कृषी विज्ञान केंद्रांच्या कार्याचा ‘क्‍यूआरटी’कडून आढावा

शेतकरी हा लाभार्थी नसून तो आपल्या कार्यातील भागीदार समजून काम व्हायला हवं. काम सर्वोत्तम कसे होईल हे पहावे. समन्वय साधून काम केल्यास तंत्रज्ञान प्रसार परिणामकारक होण्यास मदत होईल. - डॉ. आर. पी. एस. रतन, माजी संचालक विस्तार शिक्षण, बी. ए. यू. रांची. ग्रामीण व शहरी समन्वय साधून तंत्रज्ञान प्रसार व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकद्‌वारे सहभाग वाढविल्यासच शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. - डॉ. इंद्रजित माथूर, माजी संचालक विस्तार शिक्षण, एमपीयूएटी, उदयपूर. उपलब्ध संसाधनाचा वापर करून एकात्मिक शेतीपद्‌धतीचा अवलंब कसा होईल ते पहावे. - डॉ. सुधीर रायझदा, माजी महासंचालक, मत्स्यपालन, आयसीआर.
कृषी विज्ञान केंद्रांच्या कार्याचा ‘क्‍यूआरटी’कडून आढावा
कृषी विज्ञान केंद्रांच्या कार्याचा ‘क्‍यूआरटी’कडून आढावा

औरंगाबाद : दर पाच वर्षांनंतर येणारी ‘कन्क्‍युनल रिव्हीव्ह टीम'' (क्‍युआरटी) तब्बल आठ वर्षांनंतर औरंगाबाद येथे आली. या क्‍युआरटीने दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यासह जळगाव, नाशिक येथील १२ कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी विस्तार व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा कार्याचा आढावा घेतला. 

क्‍युआरटी साधारणत: दर पाच वर्षांनी कृषी विज्ञान केंद्रांच्या कार्याचा आढावा घेऊन तो आयसीआरला सादर करीत असते. प्रत्येक कृषी विज्ञान केंद्र अभीप्रेत दिशानिर्देशानुसार कार्यरत आहे, की नाही याची प्रत्यक्ष स्थिती त्या त्या कृषी विज्ञान केंद्राने राबविलेल्या विविध विषयाच्या माहितीतून जाणून घेणे हा क्‍युआरटीचा मुख्य उद्देश असतो.  २०१०-११ मध्ये क्‍युआरटीने औरंगाबाद येथे कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला होता.

मराठवाड्यातील १०, जळगाव व नाशिकमधील प्रत्येकी एक अशा बारा कृषी विज्ञान केंद्रातील विविध विषयानुरूप कार्य अहवाल तयार करण्याच्या कामाला गती आली होती. २६ सप्टेंबरला रांची येथील बी. ए. यू. चे माजी संचालक डॉ. आर. पी. एस. रतन, उदयपूरच्या एपीयूएटीचे माजी संचालक विस्तार शिक्षण डॉ. इंद्रजित माथूर, आयसीआरच्या मत्स्यपालनचे माजी सहाय्यक संचालक डॉ. सुधीर रायझादा यांच्यासह अटारी पुणेचे संचालक डॉ. लखन सिंग हे क्‍युआरटीचे प्रतिनिधी म्हणून दाखल झाले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवस चालणाऱ्या या आढावा बैठकीचे उद्‌घाटन करण्यात आले. अहवाल सादरीकरणामध्ये शेतीमध्ये राबविलेले तंत्रज्ञान, त्याचा स्वीकार, अंमलबजावणीच्या पद्‌धती, त्यामधील अडचणी याचा समावेश राहिला. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, आत्माचे उपसंचालक प्रकाश आव्हाळे यांनीही या पुनरावलोकनात सहभागी होऊन जिल्ह्यातील कृषी विस्ताराची माहिती दिली. शास्त्रज्ञांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील पिकांची पाहणी केली. इंगोले व कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख प्रा. दिप्ती पाटगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन झाले. डॉ. किशोर झाडे, डॉ. अनिता जिंतूरकर, प्रा. जी. बी. यादव, डॉ. पिसोर, प्रा. निरूवळ आदींनी परिश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com