पालकमंत्री राम शिंदे
पालकमंत्री राम शिंदे

आवश्‍यकता असेल तेथे चारा छावण्या सुरू करणार : पालकमंत्री राम शिंदे

नगर : चाराटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २६८२ हेक्‍टरवर मका आणि ज्वारीची पेरणी करून त्यापासून अंदाजे १ लाख ३४ हजार ११५ मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे. 

ज्या ठिकाणी आवश्‍यकता भासेल, तेथे चारा डेपो आणि जनावरांच्या छावण्या सुरू करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दुष्काळ निवारण आढावा बैठक सोमवारी पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, की जिल्ह्यातील पशुधनाची संख्या आणि सध्याची चाऱ्याची उपलब्धता लक्षात घेऊन त्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहा. चारानिर्मितीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बियाणेवाटप करून, गाळपेर जमिनीवर चारा तयार करावा. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याबाहेर चाराविक्री करण्यास प्रतिबंध केला आहे, तसेच अतिरिक्त चारानिर्मितीसाठी नियोजन केले आहे. वैरण विकास, हिरवा चारानिर्मितीसाठी शेतकऱ्यांना बियाणे आणि गवताचे ठोंबेवाटप करण्यात येत आहेत. याशिवाय आवश्‍यकता भासली, तर उसाचा वापर करता येणार आहे.

`गूळ, मिठाच्या प्रक्रियेतून चारा` जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या मदतीने बगॅसचा वापर किंवा गूळ आणि मिठाची प्रक्रिया करून चारा म्हणून वापर करण्याच्या पर्यायाचाही विचार केला जाणार आहे. जलाशय अथवा तलावाखालील जमिनीवर चारा पिके घेण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचे शिंदे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com