हळद लागवडीत सुधारित तंत्रज्ञान अवलंबा ः चारठाणकर

हळद लागवडीत सुधारित तंत्रज्ञान अवलंबा ः चारठाणकर
हळद लागवडीत सुधारित तंत्रज्ञान अवलंबा ः चारठाणकर

परभणी ः तुलनेने कमी पाण्यावर किफायतशीर उत्पादन देणाऱ्या हळद पिकांच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास अधिक उत्पादन मिळते, असे प्रतिपादन शिरडशहापूर (ता. औंढानागनाथ) येथील प्रगतिशील शेतकरी रेणुकादास देशपांडे चारठाणकर यांनी केले.

सेलू (जि. परभणी) येथील नूतन महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटना आणि वनस्पतिशास्त्र विभागातर्फे ‘हळद लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर शुक्रवारी (ता. १) आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

या वेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर अध्यक्षस्थानी होतेय. सुधीर आघाव, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, त्र्यंबक बोराडे, वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. वसंत पांचाळ, डॉ. निर्मला पद्मावत, प्रा. लिंबाजी काळे, प्रा. दयानंद जामगे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

श्री. देशपांडे पुढे म्हणाले, की कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत. दुष्काळी स्थितीमुळे पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. या परिस्थितीत सुधारित हळद लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाणी, खत, कीड व्यवस्थापन केल्यास हळदीपासून चांगले उत्पादन मिळते. या वेळी त्यांनी हळद प्रक्रिया तसेच विक्री व्यवस्थेबाबत माहिती दिली. पारंपरिक पिके घेण्याऐवजी शेतकऱ्यांनी नव नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीलक्ष देणे गरजेचे आहे, असेही श्री. देशपांडे चारठाणकर यांनी नमूद केले. 

सूत्रसंचालन प्रा. नागेश कान्हेकर, डॉ. पांचाळ यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी प्रा. डी. बी. गायकवाड, प्रा. आसाराम मदने, प्रा. हेसे, प्रा. दयानंद जामगे यांनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com