agriculture news in Marathi, Rian possibility in Kokan, central Maharashtra and Marathwada , Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (ता. १७) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. कोकणातील पालघर, ठाणे, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, विदर्भातील औरंगाबाद, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार, तर विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (ता. १७) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. कोकणातील पालघर, ठाणे, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, विदर्भातील औरंगाबाद, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार, तर विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र आज (ता. १७) निवळून जाणार आहे. यातच मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत आहे. पूर्व बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे या भागात हवेचा पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तर पश्चिम किनाऱ्यासह महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होत आहे. यामुळे राज्यात पावसाला सुरवात होणार आहे. गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : पालघर ६२, वसई ६९, भिरा ६८, खालापूर ६९, रोहा ३०, तळा ४९, राजापूर ३८, रत्नागिरी ३९, संगमेश्वर ४८, दोडामार्ग ३८, कणकवली ३०, कुडाळ ३५, सावंतवाडी ७६, कल्याण २९, ठाणे ३७. 
मध्य महाराष्ट्र : गगणबावडा ५८, हर्सूल ३२, मुल्हेर २३, महाबळेश्वर २७. 
विदर्भ : चिखलदरा २५, कोर्पणा ३२.

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...