नाशिक जिल्ह्यात पावसामुळे भातशेतीचे नुकसान

नाशिक जिल्ह्यात पावसामुळे भातशेतीचे नुकसान
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे भातशेतीचे नुकसान

नशिक : इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ सुरगाणा तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेती संकटात सापडली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून धो-धो पडणाऱ्या पावसाचे पाणी भाताच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये साचून राहिल्याने भातरोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.  या वर्षी खरीप हंगामात पाऊस उशिरा झाल्याने भात लागवड उशिरा झाली. अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी, कर्ज घेऊन हंगामात पिकांचे नियोजन केले आहे. काही शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून शेत सपाट केले होते. मात्र पावसाच्या पाण्याच्या तडाख्यात मातीसह भराव वाहून गेला आहे.  भात लागवडीचे क्षेत्र पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. तर काही शेतातील रोपे पुराच्या पाण्यात वाहून गेले. अनेक ठिकाणी पाणी तुंबून शेताचे बांध फुटले आहेत. तर काही ठिकाणी शेतात पाणी वाहिल्याने पिकासह माती वाहून गेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रोपे पिवळी पडून सडण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, भात लागवड, मशागत, बियाणे, खते व मजुरी यावर केलेला खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शेतकरी तातडीने पंचनामे करून भरपाईची मागणी करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com