सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेतीला पावसाचा फटका

माझी पाच एकर शेती असून, त्यापैकी काही शेती मी एसआरटी पद्धतीने करतो. त्यामुळे मला चांगले उत्पादन मिळते. गेल्या वर्षी एका गुंठ्याला १२६ किलो उत्पन्न घेतले. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार देखील झाला. परंतु या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि त्यानंतर झालेल्या क्यार वादळाने आमच्या ७० टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. - विष्णू महादेव तामाणेकर, शेतकरी, गोठोस, ता. कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेतीला पावसाचा फटका
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेतीला पावसाचा फटका

सिंधुदुर्ग: सतत पडणारा मुसळधार पाऊस आणि ‘क्यार’ वादळाने उडविलेला हाहाकार यामुळे परिपक्व स्थितीत असलेली जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रातील भातशेती जमीनदोस्त झाली आहे. हाता तोडांशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अतिवृष्टीने चाराही कुजला असून, जनांवराच्या वैरणीचा प्रश्‍न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भातशेतीसोबतच फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी खरिपांसाठी विविध सहकारी संस्था, जिल्हा बँक, राष्ट्रीयीकृत बँकांकडून सुमारे २४९ कोटी रुपयाचे कर्ज घेतले आहे. जिल्ह्यात एकूण ७८ हजार शेतकरी आहे. शेतकऱ्यांचे प्रमख पीक म्हणून भातशेतीकडे पाहीले जाते. भातशेतीवर येथील बहुतांशी शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. जिल्ह्यात ५९ हजार २३० हेक्टर क्षेत्र भातशेतीखाली आहे. परंतु या वर्षी भातलावणीनंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीत १०० हेक्टरहून अधिक भातशेती पाण्याखाली राहिल्यामुळे कुजून नुकसान झाले. उर्वरित भातशेती चांगल्या स्थितीत होती. पीकही चांगले आले. मात्र परिपक्व झाल्यानतंर सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना भातकापणी करण्यास वेळच मिळाला नाही. त्यातच नुकत्याच झालेल्या क्यार वादळाने जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के भातशेती जमीनदोस्त केली. भाताच्या लोंब्या चिखलात रुतल्या आहेत; तर काही ठिकाणी भातांच्या लोंब्यांना शेतातच कोंब फुटले आहेत. काहींनी कापणी केलेली भातशेती वाहून गेली. त्यामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. भातपिकासोबतच काजू आणि सुपारी पिकांचे मोठे नुकसान या वर्षीच्या अतिवृष्टीने झाले आहे.  पावसामुळे अनेक भागांतील गवतदेखील कुजले आहे. त्यामुळे जनावरांच्या वैरणीचा प्रश्‍न गंभीर बनणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीला पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बळ दिले आहे. प्रतिक्रिया

आठ एकर भातशेतीवर माझ्या कुटुंब चालते. ऑगस्टच्या अतिवृष्टीतून आम्ही काही अंशी सावरत होतो. परंतु क्यारने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. - विष्णू विनायक परब, शेतकरी, निवजे, ता. कुडाळ

पाऊस आणि क्यार वादळामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचे संयुक्त पंचनामे करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. - अमोल आगवान, तालुका कृषी अधिकारी, वैभववाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com