agriculture news in Marathi rice crop over 2.5 thousand hector in trouble due to rain Maharashtra | Agrowon

अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या पावसाने संकटात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टरवरील भातपीके सतत पडणाऱ्या पावसामुळे धोक्यात आली आहेत. 

सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टरवरील भातपीके सतत पडणाऱ्या पावसामुळे धोक्यात आली आहेत. येत्या आठवडाभरात या भातपिकांची कापणी न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टरपैकी अडीच ते तीन हजार हेक्टरवर हळवी भातबियाणे आणि भिजवणीच्या भातरोपांची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी २० मे ते २५ मे या कालावधीत भिजवणीची पेरणी करण्यात आली. त्यानंतर जुनच्या पहिल्या आठवड्यात हळव्या भातबियाण्यांची पेरणी करण्यात आली. भिजवणीची भातपीके करताना शेतकरी शक्यतो ११० ते १२० दिवस कालावधीची करतात. तर, हळव्या भातपीकांचा कालावधी ९५ ते १०५ दिवसांचा असतो. 

सध्या ही सर्व भातशेती  परिपक्व झाली आहे. ती कापणीला आलेली आहे. परंतु, जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. जोर ओसरला असला तरी पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे परिपक्व झालेली भातशेतीची शेतकऱ्यांना कापणी करता येत नाही. मागील तीन, चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसात काही भागातील शेतीचे नुकसान झाले आहे. परंतु, मोठ्या प्रमाणात परिपक्व झालेल्या भातपीकांची कापणी करता येत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

येत्या आठवड्यात या भातपिकांची कापणी झाली नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे परिपक्व झालेली भातशेती जमिनीला चिकटली आहे. त्यामुळे येत्या दोन, तीन दिवसांत पावसाने भातकापणीला मोकळीक दिली नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी सध्या त्याच विवचनेंत आहे.


इतर अॅग्रो विशेष
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...