Agriculture news in marathi, Rice damage due to return rainfall | Agrowon

मुळशी तालुक्यात परतीच्या पावसामुळे भातपिकांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

कोळवण : मुळशी तालुक्यात परतीच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडले आहे. त्यामुळे पुढील काळातही नुकसानीची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आता भात कापणी हंगाम सुरू होत असताना पावसाचे संकट पुन्हा समोर ठाकल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

कोळवण : मुळशी तालुक्यात परतीच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडले आहे. त्यामुळे पुढील काळातही नुकसानीची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आता भात कापणी हंगाम सुरू होत असताना पावसाचे संकट पुन्हा समोर ठाकल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

मुळशी तालुक्यात मागील आठवड्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसा कडकडीत ऊन पडते. सायंकाळी मात्र अचानक आभाळ भरून येऊन जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे परिसरातील ओढे- नाल्यांना मोठा पूर आला. परतीच्या या पावसाचा भातशेतीवर मात्र प्रतिकूल परिणाम झाला आहे. कापणीयोग्य पीक शेतात आडवे झाल्याने उत्पादनात घट येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पीक शेतात आडवे झाल्यामुळे दाणे गळ होऊन पुढील काळात नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. 

सातगाव पठार परिसरात मुसळधार;  शेतीकामे रखडली

सातगाव पठार : परिसरात गुरुवारी (ता. १०) सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान व रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील कांदा, मका आदी पिकांचे काही प्रमाणावर नुकसान झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांची शेतीची कामे रेंगाळली आहेत.

सातगाव पठार भागातील पेठ, कारेगाव, भावडी, थुगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी आदी गावांत गुरुवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. या परिसरातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मका लागवड केली आहे. हे मक्याचे पीक पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे खाली पडले आहे. तसेच शेतांत पाणी साचून नुकतीच लागवड केलेली कांदा रोपे काही ठिकाणी पाण्याखाली गेली होती. त्यामुळे कांदा पीक हातचे जाते की काय? अशी चिंता या भागातील शेतकऱ्यां‍ना आहे. मात्र पावसाने उघडीप दिल्याने तुर्तास तरी या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

थंडी, ऊन अन् ढगांचा खेळ

सातगाव पठार भागात सध्या पहाटे थंडी असते. दुपारच्या वेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवत आहे. संध्याकाळी मात्र आकाशात काळे ढग जमा होऊन पावसाचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतीची कामे दिवस मावळायच्या आत उरकण्याकडे शेतकरी भर देत असल्याचे कारेगाव (ता. आंबेगाव) येथील प्रगतशील शेतकरी उल्हास घेवडे यांनी सांगितले.

इतर बातम्या
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात नुकसानीपोटी १८१ कोटींची...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांना...
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला गेले तडे ! ५०...नाशिक  : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे...
...'या' सिंचन योजनेची पाणीपट्टी होणार...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीची...
किसान सभेकडून विमा कंपनीला २८...पुणे : पुण्यातील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून...
हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत...आळंदी, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि...
गूळ सौदे सुरू करण्यासाठी दोन्ही घटकांना...कोल्हापूर  : गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी...
सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी...सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होताच...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
कोल्हापुरात कारखान्यांकडून ऊसतोड सुरू...कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...