agriculture news in Marathi rice export will be record level Maharashtra | Page 3 ||| Agrowon

तांदळाची विक्रमी निर्यात होणार 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस पडल्यामुळे तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस पडल्यामुळे तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे १४० लाख टन तांदळाची निर्यात होणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी साधारणतः ९५ लाख टनाची निर्यात झाली होती. यावर्षी तांदळाच्या निर्यातीचा विक्रम होणार असल्याचा अंदाज तांदळाचे देशपातळीवरील व्यापारी व फेडरेशन ऑफ असोसिएशन महाराष्ट्र (फाम)चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी व्यक्त केला आहे. 

यंदाच्या चांगल्या पावसामुळे बासमती तसेच इतर प्रकारच्या तांदळाचे उत्पादन वाढणार असल्यामुळे तांदूळ निर्यातीत भारत तिसऱ्या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. निर्यातीमध्ये अनुक्रमे थायलंड, व्हिएतनाम आणि भारताचा क्रमांक असतो. मात्र यंदा थायलंड आणि व्हिएतनामध्ये तांदळाचे उत्पादन घटल्यामुळे भारत निर्यातीमध्ये क्रमांक एकवर जाण्याची शक्यता आहे.

थायलंडमध्ये यंदा केवळ ६० ते ७० लाख टन तांदळाच्या निर्यातीची शक्यता आहे. तर व्हिएतनाममध्ये दुष्काळामुळे तांदळाचे उत्पादन घटल्याने निर्यातीमध्ये घटीची शक्यता शहा यांनी व्यक्त केली आहे. 

यावेळी आफ्रिकन देशांकडूनही बिगर बासमती तांदळाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असल्यामुळेही निर्यातीत वाढ होईल. मागील वर्षी आपली बिगर बासमती तांदळाची निर्यात ही मागील आठ वर्षातील सर्वांत कमी झाली होती. परंतु यावर्षी तांदळाचे जास्त उत्पादन झाल्यामुळे निर्यात मागील वर्षीच्या सुमारे ४५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे देशात परकीय चलन मोठ्या प्रमाणावर वाढेल, असे शहा यांनी सांगितले. 

‘बासमती’ निर्यातीत १३ टक्के वाढ 
केंद्रीय कृषी मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील निर्यातीची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार बासमती तांदळाची निर्यात १३ टक्क्यांनी वाढली असून, बिगर बासमती तांदळाची निर्यात १०५ टक्क्‍यांनी वाढली असल्याचे जाहीर केले आहे. 
 


इतर अॅग्रोमनी
कापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...
देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...
कोल्हापुरी गुळाला गुजरातेत आव्हान;...कोल्हापूर : यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील...
भारतात यंदा ३६० लाख कापूस गाठींचे...मुंबई : भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७०...
प्रोजेक्ट रिपोर्ट, लायसन्ससाठी यापुढे...पुणे : केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ...
देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन कोल्हापूर : देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन...
बाजारात हरभराही खाणार भाव हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग,...
द्राक्ष वाइन उत्पादनात ३५ टक्के घट शक्य नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाइन उत्पादकांनी...
शेतमाल बाजारातील सुधारणा कायम राहीलवॉशिंग्टन ः शेतीमालाचा आंतरराष्ट्रीय बाजार यंदा...
अर्जेंटिनात महागाई भडकलीब्युनॉस आयर्स ः अर्जेंटिनात शेतीमालाचे दर...
तुरीने खुल्या बाजारात ओलांडला हमीभावाचा...नगर : तुरीचे शासनाकडून हमी दराने खरेदी केली जात...
सोयाबीन पाच हजारांवरपुणे ः उत्पादनात घट, वाढलेली मागणी आणि चांगली...
तूर टप्प्‍याटप्प्याने विकण्याचे आवाहन पुणे ः देशात यंदा तूर उत्पादनात ३० टक्‍...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ...
शेतजमीन भाडेपट्ट्यावर देण्यासाठी...नवी दिल्ली ः शेतजमिनी भाडेपट्ट्यावर देण्यासाठी...
‘व्हेजनेट’वर होणार ४३ पिकांची नोंदणी नागपूर ः निर्यातीसह देशांतर्गत ग्राहकांना...
शेती, संलग्न क्षेत्रांच्या निधीत कपात पुणे ः केंद्रीय अर्थसंकल्पात यंदा शेती आणि संलग्न...
बियाणे उद्योगाला जीएसटी परताव्याची...पुणे : अंतिम उत्पादनावर जीएसटी नसला तरी...
साखर विक्रीचा दबाव कायम कोल्हापूर : साखर विक्रीच्या दबावाखाली आलेल्या...
कृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणारनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत...