agriculture news in Marathi, rice field damage in Ratnagiri, Maharashtra | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

रत्नागिरी ः राजापूर तालुक्यातील अर्जुना, मुचकुंदी नद्यांना आलेल्या पुरात किनाऱ्यावरील शेकडो एकर भातशेती बाधित झाली आहे. शेताच्या बांधावर जाऊन भातशेतीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करा, अशा सूचना तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिल्या आहेत. 

रत्नागिरी ः राजापूर तालुक्यातील अर्जुना, मुचकुंदी नद्यांना आलेल्या पुरात किनाऱ्यावरील शेकडो एकर भातशेती बाधित झाली आहे. शेताच्या बांधावर जाऊन भातशेतीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करा, अशा सूचना तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिल्या आहेत. 

तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना आणि मुचकुंदी नद्यांना काही दिवसांपूर्वी पूर आला होता. सलग पाच दिवस राहिलेल्या पूरस्थितीने तालुक्यात विविध प्रकारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात भातशेतीचाही समावेश आहे. नद्यांना आलेल्या या पुरामध्ये काठावरील शीळ, गोठणेदोनिवडे, चिखलगाव, गोवल, शिवणे, हर्डी, शुक नदीच्या काठावरील प्रिंदावण, वाल्ये, शेजवली आदी गावांमधील भातशेती पुराच्या पाण्याखाली होती. काठावरील ही भातशेतीची नुकतीच लावणी झाली होती.

भाताची रोपे पाच दिवस पाण्याखाली राहिल्याने अनेक भागांत ती कुजली आहेत. काही भागांत रोपे वाहून गेली आहेत. काही ठिकाणी पुरासोबत वाहून आलेल्या चिखलामध्ये ती गाडून गेली होती. त्यातून अनेक गावांमधील शेकडो एकर भातशेती बाधित झाली आहे.

पुरामुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तहसीलदार श्रीमती वराळे याच्या सूचनेनुसार महसूल प्रशासनातर्फे गावोगावी जाऊन लोकांशी संवाद साधून शेतीसह अन्य झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्या सूचनेनुसार आणि तालुका कृषी अधिकारी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागानेही शेतीच्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. नुकसानीच्या सर्वेक्षणात शेतकरी वंचित राहणार नाहीत, अशा सूचना आमदार राजन साळवी यांनी प्रशासनाला केली आहे.

याबाबत संतोष हातणकर म्हणाले, की पूरस्थितीत नुकसान झालेल्या काही गावांमध्ये मूळ जमीनमालक एक आहे आणि जमीन कसणार शेतकरी वेगळा अशी स्थिती आहे. त्यामुळे जमीन मालकांना अनेकवेळा नुकसानभरपाई मिळते. प्रत्यक्षात जमीन कसणारे शेतकरी वंचित राहतात. याचा विचार होऊन प्रत्यक्षात शेती करणाऱ्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळावी.

इतर अॅग्रो विशेष
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...
शासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...
पूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...
शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...
दुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...