agriculture news in Marathi, rice field in treat of water and mud, Maharashtra | Agrowon

रत्नागिरीत पुराचे पाणी, गाळाचा भातशेतीला धोका
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

रत्नागिरी ः पावसाने उघडीप घेतली असली, तरीही नदीकिनारी भागातील भातशेतीमधील पाण्याचा अजूनही निचरा झालेला नाही. पुराच्या पाण्याबरोबर आलेला गाळ शेतात साचून राहिल्याने शेकडो एकर जमीन बाधित होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नदीकिनाऱ्यावरील विविध गावांतील सुमारे पाच चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्र पुराच्या पाण्याखाली गेले होते.

रत्नागिरी ः पावसाने उघडीप घेतली असली, तरीही नदीकिनारी भागातील भातशेतीमधील पाण्याचा अजूनही निचरा झालेला नाही. पुराच्या पाण्याबरोबर आलेला गाळ शेतात साचून राहिल्याने शेकडो एकर जमीन बाधित होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नदीकिनाऱ्यावरील विविध गावांतील सुमारे पाच चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्र पुराच्या पाण्याखाली गेले होते.

जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. हाच जोर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नोंदला गेला. रत्नागिरी जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्यांचा उगम आंबा घाट, महाबळेश्‍वरमधील डोंगररांगांमधून होतो. पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. याचा फटका भातशेतीलाही बसला आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील बहुतांश नदीकिनारी असलेली शेती आठ ते दहा दिवस पाण्याखाली होती. दापोली, राजापूरसह मंडणगडात काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. 

रत्नागिरी तालुक्यातही टेंबेपूल, सोमेश्‍वर, पोमेंडी परिसरातील शेतात काजळीच्या पुराचे पाणी घुसून जमीन नापीक बनली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार बाव नदीकिनाऱ्यालगत २.५ चौरस किलोमीटर शेतीक्षेत्र आहे. त्याला पुराच्या पाण्याचा फटका बसतो. मुचकुंदी किनारी ०.३५ चौकिमी क्षेत्र, सप्तलिंगी किनारी ०.१५ चौकिमी, काजळीला ०.७५, सोनवी १.०२ चौकिमी, गडनदी ०.६० चौकिमी, गडन ०.६५ चौकिमी क्षेत्राला पुराचा फटका बसतो. संगमेश्‍वर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहा गावांतील शेतकऱ्यांना दुबार पिकाचीही संधी शिल्लक राहिलेली नाही.

इतर ताज्या घडामोडी
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...