agriculture news in Marathi, Rice mill action at Bhangaram Talodi | Agrowon

भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाई
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 मे 2019

चंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका राईसमिलवर छापा टाकून तेथील तब्बल साडेतेरा लाख रुपयांचा अवैध खत साठा जप्त करण्यात आला. भंगाराम तळोधी (ता. गोंडपिंपरी) येथे ही कारवाई करण्यात आली. 

चंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका राईसमिलवर छापा टाकून तेथील तब्बल साडेतेरा लाख रुपयांचा अवैध खत साठा जप्त करण्यात आला. भंगाराम तळोधी (ता. गोंडपिंपरी) येथे ही कारवाई करण्यात आली. 

भंगाराम तळोधी येथील अनिल बाबूराव अल्लूरवार यांची बालाजी राईसमिल आहे. त्यांचेच आष्टीत हर्ष कृषी सेवा केंद्रदेखील आहे. खरिप हंगाम तोंडावर असल्याने खतांचा काळाबाजार करीत जादा पैसे कमविण्याच्या उद्देशाने अल्लूरवार यांनी खतांचा अवैध साठा केला होता. याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांना मिळाली. त्याआधारे त्यांनी बालाजी राईसमिलमध्ये छापा टाकला असता रासायनिक खतांच्या तीन हजार ५५० बॅग आढळल्या. या खताची किंमत साडेतेरा लाख रुपये इतकी आहे. दरम्यान, याप्रकरणी अनिल अल्लूरवारविरोधता विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

आष्टीतील कृषी केंद्रात एचटी बीटीचा साठा
अनिल अल्लूरवार यांचे गडचिरोलीतील आष्टी येथे हर्ष कृषी सेवा केंद्र आहे. त्या ठिकाणी अन्य पथकाने छापा टाकला. त्यामध्ये ३० लाख रुपये किमतीची ३८०० एचटी बीटीची पाकिटे जप्त करण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...