शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २० टक्के घटण्याची शक्यता

शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २० टक्के घटण्याची शक्यता
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २० टक्के घटण्याची शक्यता

सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. गेल्या चार दिवसांपासून भात काढणीस प्रारंभ झाला आहे. मात्र, या वर्षी महापुराने शिराळा पश्‍चिम भागातील वारणा नदीकाठच्या परिसरातील भातपीक वाया गेले आहे. त्यामुळे उत्पादनात अंदाजे २० टक्‍क्‍यांनी घट होण्याची शक्‍यता आहे.

शिराळा पश्‍चिम भागात भाताला पोषक असे हवामान आहे. त्यामुळे या तालुक्‍यात भाताची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. दरवर्षी तालुक्‍यात सरासरी १३ हजार हेक्‍टरवर भात लागवड असते. शिराळा तालुक्‍यात यंदा १२ हजार ९३९ हेक्‍टरवर पेरा झाला. या वर्षी निसर्गाच्या प्रकोपाने झालेल्या महाप्रलयंकारी महापुराने रुद्रावतार धारण करून तालुक्‍यातील जवळपास ४० ते ५० टक्के भात शेतीचे नुकसान झाले. पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ भात शेतीत पाणी असल्याने त्याची वाढ खुंटली. 

गेल्या आठवड्यापासून भात काढणीला सुरवात झाली. परंतु परतीचा पाऊस सुरू झाल्याने ही काढणी थांबवली होती. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा भात काढणीला गती आली आहे. मात्र, त्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

भात काढणीत ‘पैरा पद्धती’ 

शिराळा पश्‍चिम भागात आगाप पेरणी झालेल्या भात पिकाची काढणी सुरू आहे. ट्रॅक्‍टर भात खेप इंधन दरवाढ ४०० वरून ५०० रुपयांवर गेली आहे. रोजंदारी मजुरांना सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत दोन पायली रोजंदारी मोजावी लागते. शेतकऱ्यांना मजुरांकडून काम करवून घेणे परवडत नाही. त्यामुळे भात काढणीला ‘पैरा पद्धती’ (एकमेकांना भात काढणीला साह्यता) ग्रामीण भागात रूढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com