उत्तर महाराष्ट्रात भात उत्पादनात ३५ टक्के घट शक्य

खरीप हंगामाच्या सुरवातीला उत्तर महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने भाताची पुनर्लागवड चालू वर्षी लांबणीवर गेली. तरीही १ लाख २० हजार ९५ हेक्टरवर ११३ टक्के लागवडी झाल्या आहेत.
rice damage
rice damage

नाशिक: खरीप हंगामाच्या सुरवातीला उत्तर महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने भाताची पुनर्लागवड चालू वर्षी लांबणीवर गेली. तरीही १ लाख २० हजार ९५ हेक्टरवर ११३ टक्के लागवडी झाल्या आहेत. एकंदरीत लागवडी वाढल्या आहेत. मात्र आता पिकांवर बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांसह तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे भाताचे उत्पादन ३५ टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  उत्तर महाराष्ट्रात नियमित १५ ऑगस्टअखेर होणाऱ्या लागवडी चालू वर्षी तीन आठवडे उशिरा झाल्या आहेत. शास्त्रीय पद्धतीनुसार रोपवाटिका टाकल्यानंतर २१ ते ३० दिवस फार तर फार ४० दिवसांपर्यंत पुनर्लागवड होणे अपेक्षित असते. मात्र चालु वर्षी अनेक शेतकऱ्यांच्या लागवडी ६० दिवसांची रोपे झाल्यानंतरही लागवडी केल्या तर काहींची रोपे खराब झाल्याने पुन्हा रोपवाटिका तयार करून उशिरा लागवड उशिरा आहेत. प्रामुख्याने नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात भात लागवडीचे क्षेत्र अधिक आहे. लागवडी वेळेवर होऊ न शकल्याची स्थिती आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हाताशी आलेला घास वाया गेला असताना सलग दुसऱ्या वर्षी हे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे.  तज्ज्ञांच्या पथकाकडून पाहणी इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांसह नगर जिल्ह्यातील अकोले तालुकाच्या काही भागात इगतपुरी विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी पाहणी दौरा केला. फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेतच याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पादन अपेक्षित असते, मात्र यात ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. हा प्रादुर्भाव काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याने प्रक्षेत्र भेटीत काही प्रतिबंधात्मक उपाययोजना व शिफारशी करण्यात आल्याचे केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय कुसाळकर यांनी सांगितले.

ही आहेत प्रमुख कारणे

  • वेळेवर लागवडीसाठी नसलेला पाऊस
  • लागवडी झाल्यानंतर वाढीच्या अवस्थेत पावसाने जुलै महिन्यात दिलेला खंड
  • दाणे भरण्याच्या अवस्थेत बुरशी जन्य व जीवाणू जन्य -करपा रोगांसह तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव 
  • प्रतिक्रिया सध्या बुरशीजन्य पानांवरील करप्यासह जीवाणुजन्य करप्याचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. पानांमध्ये अन्ननिर्मिती होत नसल्याने उत्पादनासह दाण्यांची गुणवत्ता जेमतेम राहणार आहे. यामुळे प्रमाण जास्त वाढत गेल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. - डॉ. सुरेश परदेशी, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ,''मफुकृवि''चे विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि.नाशिकं

    सध्या बुरशीजन्य पानांवरील करप्यासह जीवाणुजन्य करप्याचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. पानांमध्ये अन्ननिर्मिती होत नसल्याने उत्पादनासह दाण्यांची गुणवत्ता जेमतेम राहणार आहे. यामुळे प्रमाण जास्त वाढत गेल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. - डॉ. सुरेश परदेशी, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ,''मफुकृवि''चे विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि.नाशिक

    भात पिकावर दाणे भरण्याच्या व पक्वतेच्या स्थितीत तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर भाताच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी टकले पडल्यासारखे दिसून येत आहे. त्यामुळे शिफारशीनुसार फवारण्या घेऊन वेळेत उपाययोजना केल्यास होणारी घट टाळता येणे शक्य आहे. - डॉ. संजय पाटील, कीटकरोग शास्त्रज्ञ, ''मफुकृवि''चे विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि.नाशिक

    लागवडीची स्थिती  (हेक्टर) जिल्हाः लागवड  नाशिकः ९२४०३ नंदुरबारः २३०५७ धुळेः ४६३५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com