तांदळाच्या हंगामाला उशिराने सुरुवात

The rice season started late
The rice season started late

पुणे ः यंदा मॉन्सूनचे उशिराचे आगमन व रखडलेल्या मुक्कामामुळे भाताच्या लागवडी उशिरा झाल्या. त्यामुळे काढणीचा हंगाम ही लांबला. डिसेंबरमध्ये सुरू होणारा तांदळाचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे तांदळाचे उत्पादन २० टक्क्यांपर्यंत घटले. तसेच आंबेमोहर तांदळाच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

याबाबत पुणे बाजार समितीमधील प्रमुख विक्रेते राजेश शहा म्हणाले, ‘‘दरवर्षीप्रमाणे नवीन तांदूळाच्या आवकेला प्रारंभ झाला आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे यंदा भाताचे २० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. तर हंगामदेखील एक ते दीड महिना उशिराने सुरू झाला आहे. सध्या आवक होत असलेल्या तांदळामध्ये प्रामुख्याने पारंपरिक बासमती व त्याचे उपप्रकार तिबार, दुबार, मिनी दुबार, मोगरा आणि मिनी मोगरा, ११२१, १५०९ आणि १४०१ प्रकारचा बासमती त्याचबरोबर मध्य प्रदेशातील कालीमूच्छ, लचकारी कोलम व एचएमटी कोलम, आंध्र, मध्य प्रदेशातील सुगंधी आंबेमोहर, कर्नाटकातील स्टीम व कोल्ड कोलम, सोनामसुरी व महाराष्ट्रातील प्रसिद्ध सुवासिक इंद्रायणी अशा विविध प्रकारच्या तांदळांचा समावेश आहे.’’ 

बासमतीच्या निर्यातीत घट ‘‘काही वर्षांपासून पारंपरिक बासमतीची उत्पादकता घटत असल्याने शेतकरी ११२१, १५०९ आणि १४०१ या हायब्रीड बासमती भाताला प्राधान्य देऊ लागला आहे. परिणामी पारंपरिक बासमती व त्याच्या उपप्रकारांचे उत्पादन घटल्याने आवकही घटली आहे. घटलेल्या आवकेमुळे दर वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, इराण व युरोपमध्ये होणारी निर्यात घटल्यामुळे त्याच्या दरात १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट आलेली आहे,’’ असेही शहा यांनी सांगितले.

मागील वर्षीच्या व यंदाच्या वर्षीच्या नवीन हंगामातील विविध प्रकारच्या तांदळाचे तुलनात्मक दर 
तांदळाचा प्रकार जानेवारी २०१९  दर रु/क्विंटल जानेवारी २०२०  दर रु/क्विंटल
बासमती ११५०० ९०००
बासमती तिबार ९५०० ८००० 
बासमती दुबार ९००० ७००० 
बासमती मोगरा ५५००  ५०००
बासमती मिनी मोगरा ४५०० ४२००
आंबेमोहर (एमपी) ६००० ६ ५००
आंबेमोहर (आंध्र) ७२०० ७ ८००
लचकारी कोलम (एमपी) ५५०० ५०००
कोलम (आंध्र) ४८०० ४८००
कोलम (गुजरात) ४२०० ४५००
कोलम (वाडा) ५८०० ते ६००० ५३०० ते ५५००
इंद्रायणी ४५०० ते ५००० ४३०० ते ५०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com