agriculture news in Marathi rice sowing will start from 10 th June Maharashtra | Agrowon

भात लागवडीला १० जूनपासून प्रारंभ 

वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

मजूरांसंदर्भात शेतकऱ्यांची चिंता लक्षात घेऊन भात लागवडीसाठी १० दिवस आधी प्रारंभ करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मजूरांच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही 
- अमरिंदर सिंग, मुख्यमंत्री, पंजाब 

चंदिगड: लॉकडाऊमुळे मजूर परत परतल्याने शेतकऱ्यांना भात लागवडीसाठी मजूर टंचाई भासणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भात रोपवाटीका आणि लागवड १० दिवस आधी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. रोपवाटीका टाकण्यास १० मे पासून सुरुवात झाली असून लागवडीसाठी १० जूनपासून प्रारंभ होणार आहे. 

याआधी पंजाब कृषी विभागाने या खरिप हंगामात भात रोपवाटीका टाकण्यास १० मे पासून परवानगी दिली होती. तर, भात लागवडीला २० जूनपासून सुरवात करण्यात सांगितले होते. परंतु कोरोना विषाणूमुळे शेतमजूर आपल्या गावी परत जात असल्याने भात लागवडीसाठी आवश्‍यक मजूर उपलब्ध होणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. त्यामुळे यंदा भात लागवड खोळंबेल अशी भीती व्यक्त होत होती. 

राज्यातील शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी अत्याधुनिक अशा थेट भात बियाणे पेरणी (डीएसआर) पध्दती तसेच यंत्राद्वारे भात लावणी पद्धतीचा अवलंब करावा. त्यासाठी राज्य कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्‍यक असणाऱ्या यंत्रांची उपलब्धता करून द्यावी, अशी सुचना मुख्यमंत्री सिंग यांनी केली आहे. या पद्धतींमुळे शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामाना करावा लागणार नाही. 

भाताचा हमीभाव २९०२ रुपये करा 
कोरोना महामारीच्या काळात देशाची अन्नसुरक्षा अभाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी केंद्राने भाताचा हमीभाव २ हजार ९०२ रुपये प्रतिक्विंटल करावा. तसेच त्यांनी पिकांचे अवशेष जाळू नये यासाठी प्रतिक्विंटल १०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री सिंग केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मागील हंगामात केंद्राने भातासाठी १८३५ रुपेय हमीभाव दिला होता. 


इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...