Agriculture news in Marathi, Rice, soybean crops are grown | Agrowon

भात, सोयाबीन पिके बहरली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

चास, जि. पुणे ः खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात खरीप हंगामातील भातपिके लोंब्यांनी लगडण्यास सुरवात झाली आहे. सोयाबीनची पिके शेंगांनी बहरली आहेत. 

या भागात काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने पिके जोमदार असून, चांगले उत्पन्न मिळणार असल्याची खात्री पटल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील प्रामुख्याने खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक असून जवळपास ३२०० ते ३३०० हेक्‍टर क्षेत्रावार भात लागवडी करण्यात आल्या आहेत. 

चास, जि. पुणे ः खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात खरीप हंगामातील भातपिके लोंब्यांनी लगडण्यास सुरवात झाली आहे. सोयाबीनची पिके शेंगांनी बहरली आहेत. 

या भागात काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने पिके जोमदार असून, चांगले उत्पन्न मिळणार असल्याची खात्री पटल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील प्रामुख्याने खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक असून जवळपास ३२०० ते ३३०० हेक्‍टर क्षेत्रावार भात लागवडी करण्यात आल्या आहेत. 

वाडा, वाळद, आव्हाट, खरोशी, डेहणे, भोरगिरी यांसह परिसरात खरीप हंगामात भात हेच मुख्य पिक असून, चालू हंगामात चांगल्या होत असलेल्या पावसामुळे पिके जोमदार आहेत. सध्या पिकांना लोंब्या लगडण्यास सुरवात झाल्याने चांगल्या उत्पन्नाची आशा शेतकरी बाळगून आहेत. काही दिवसांपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिके बहरली आहेत. 

भातपिके लोंब्यानी लगडल्याने पिकास पाण्याची नितांत गरज होती तर सोयाबीन पिकाची ही स्थिती तशीच असून भुईमूग पिकास आऱ्या लागण्याच्या अवस्थेत आहे. या पिकालाही पावसाची गरज असतानाचा पावसाने जोरदारपणे आगमन केल्याने पिकांच्या पोषणासाठी हा पाऊस उपयुक्‍त ठरत आहे. यामुळे खेडच्या पश्‍चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्पादन वाढणार असल्याने समाधान झळकत आहे.

इतर बातम्या
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊससातारा : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१८) सर्वदूर...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...