पुणे जिल्ह्यात भात, सोयाबीनचे ३० ते ४० टक्के नुकसान

पावसामुळे भाताचे आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळी सणामुळे कर्मचारी सुटीवर असल्याने अनेकजण अजूनही हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात किती नुकसान झाले याची माहिती नसल्याने कर्मचारी हजर झाल्यानंतर सर्व माहिती मिळेल. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पंचनाम्याची प्रक्रिया राबविली जाईल. - बाळासाहेब पलघडमल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे, पावसामुळे दुबार भात लागवड केली होती. यंदा जवळपास सहा एकरावर भात लागवड केली होती. त्यापैकी भाताचे तीस टक्के नुकसान झाले आहे. शेताचे बांध फुटले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी. - काळूराम घारे, शेतकरी, डोणे, मावळ,
पुणे जिल्ह्यात भात, सोयाबीनचे ३० ते ४० टक्के नुकसान
पुणे जिल्ह्यात भात, सोयाबीनचे ३० ते ४० टक्के नुकसान

पुणे : पावसामुळे भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील भात आणि सोयाबीनचे जवळपास तीन ते चार हजार हेक्टर म्हणजेच सुमारे ३० ते ४० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे सुमारे ८ ते १० हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

जोरदार पावसामुळे सर्वच ओढे, नाले, नद्या तुडुंब भरून वाहू लागले आहेत. यामुळे भात शेतीचे मोठे नुकसान होऊन भात खाचरे व ताली वाहून गेल्या आहेत. शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे.

भात पट्ट्यातील तालुक्यात मान्सूनोत्तर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्वच तालुक्यांत सोयाबीन, भुईमूग, कडधान्य, हळवे, भात पीक काढणी तसेच ज्वारी पेरणी करता आली नाही. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या चालू हंगामातील पिकांचे पूर्णपणे नियोजन ढासळले असून, हातातोंडाशी आलेला घास वाया जातो की काय, अशी परिस्थिती तयार झाली आहे.

सततचा पडणाऱ्या धोधो पावसामुळे शेती, ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पाण्याच्या जास्त प्रवाहामुळे भात शेतीच्या बांधावरून पाणी वाहून गेले आहेत. बांध, ताली फुटल्या आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून पीककर्ज घेऊन भात पिकांचे नियोजन केले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी भाताचे नुकसान झाले होते. सध्या अनेक भागांत उशिराने भात लागवडी झाल्याने पिके काही ठिकाणी वाढीच्या, तर लवकर लागवडीच्या ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहेत. त्यातच पावसाने पुन्हा सुरवात केल्याने भात पिकांचे नुकसान झाले आहे. दिवाळी सणामुळे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रशासनाविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

जिल्ह्यात भाताचे सरासरी ७२ हजार ९५४ हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी सुमारे ६२ हजार ५०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज होता. त्यापैकी ५९ हजार ३९१ हेक्टर म्हणजेच ८१ टक्के क्षेत्रावर भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका टाकण्याऐवजी मावळ व मुळशी भागातील काही शेतकऱ्यांनी एसआरटी पद्धतीने थेट भात लागवडी केल्या. त्यामुळे या भातपिके काढणीच्या अवस्थेत आली आहेत. जिल्ह्यात हवेलीत १९४६ हेक्टरवर, मुळशीत ८०६०, भोर ७५१०, मावळ १२,४६२, वेल्हे ५१८४, जुन्नर १०३७०, खेड ७२४२, आंबेगाव ५२३४, पुरंदर १३३३ हेक्टरवर भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत.  

उत्पादनात घट होण्याची शक्यता 

पश्चिम पट्ट्यातील तालुक्यात भाताचे आगार धोक्यात आले असून, उत्पादनात निम्म्याहून अधिक घट होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येत्या दोन -चार दिवसांत पाऊस जर बंद झाला नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याची स्थिती तयार झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com