तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे उत्पादन घटणार 

नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे. बाजारात नवीन तांदूळ विक्रीसाठी दाखल होऊ लागला असताना पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी, चांगल्या गुणवत्ता असलेल्या तांदळाच्या दरात वाढ होऊ लागली आहे.
Rice will become more expensive; Untimely rains will reduce production
Rice will become more expensive; Untimely rains will reduce production

नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे. बाजारात नवीन तांदूळ विक्रीसाठी दाखल होऊ लागला असताना पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी, चांगल्या गुणवत्ता असलेल्या तांदळाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात प्रति किलो तांदळाच्या दरात तीन ते चार रुपयांची वाढ झालेली आहे. तसेच नवीन हंगामात तांदळाचे भाव कमी होण्याची शक्यता धूसर आहे.  हंगामाच्या पहिल्या टप्प्यात दर वर्षी मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथून तांदळाची मोठी आवक होते. गेल्या काही वर्षांपासून तांदळाची निर्यात वाढली आहे. अमेरिका, युरोप, आफ्रिकेतून तांदळाला मागणी वाढत आहे. यंदाच्या हंगामात गत वर्षीच्या तुलनेत तांदळाच्या दरात क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांनी वाढले आहेत. यंदा प्रति क्विंटलचे दर ४२०० ते ५६०० रुपयांपर्यंत गेला आहे. त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.  मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. हंगामाच्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील तांदळाची आवक सुरू झालेली आहे. मात्र पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका बसल्याने उत्पादनाचा दर्जा कमी झालेला आहे. बिगर बासमती तांदळाची परदेशातून असलेल्या मागणीमुळे दरवाढ झाली आहे.  तांदळाच्या निर्यातीत भारताचे स्थान पहिल्या क्रमांकाचे आहे. विदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे तांदळाचे उत्पादन कमी झाले असल्याचे नागपूर किरकोळ किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. या शिवाय गहू, धान्य, खाद्य तेलाचे भाव मागणी अभावी स्थिरावलेले आहेत. एसटी बंद असल्याने ग्राहकांची बाजारातील वर्दळही कमी झालेली असल्याने सर्वच धान्याचे भाव स्थिरावलेले आहेत.  डाळींवरील निर्बंध हटविले  केंद्र सरकारने दोन जुलैला देशात डाळीच्या साठ्यावरील निर्बंध मागे घेतले आहेत. या निर्णयाचा देशातील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. केंद्र सरकारने डाळीच्या आयातीच्या निर्णयाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मसूरचे आयात शुल्क कमी केले आहे. तसेच साठ्याचे विवरण देण्याची सक्तीही सरकारने केलेली आहे. येत्या काही दिवसांत नवीन पीक बाजारात येणार आहे. त्यात सरकारने आयात करण्याच्या मुदतीत वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यांच्या पिकांना योग्य किमती मिळणार नसल्याचा आरोप दी होलसेल ग्रेन ॲण्ड सीड्स मर्चेंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी केला आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com