Agriculture News in Marathi Rice will become more expensive; Untimely rains will reduce production | Page 4 ||| Agrowon

तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे उत्पादन घटणार 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे. बाजारात नवीन तांदूळ विक्रीसाठी दाखल होऊ लागला असताना पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी, चांगल्या गुणवत्ता असलेल्या तांदळाच्या दरात वाढ होऊ लागली आहे.

नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे. बाजारात नवीन तांदूळ विक्रीसाठी दाखल होऊ लागला असताना पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी, चांगल्या गुणवत्ता असलेल्या तांदळाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात प्रति किलो तांदळाच्या दरात तीन ते चार रुपयांची वाढ झालेली आहे. तसेच नवीन हंगामात तांदळाचे भाव कमी होण्याची शक्यता धूसर आहे. 

हंगामाच्या पहिल्या टप्प्यात दर वर्षी मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथून तांदळाची मोठी आवक होते. गेल्या काही वर्षांपासून तांदळाची निर्यात वाढली आहे. अमेरिका, युरोप, आफ्रिकेतून तांदळाला मागणी वाढत आहे. यंदाच्या हंगामात गत वर्षीच्या तुलनेत तांदळाच्या दरात क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांनी वाढले आहेत. यंदा प्रति क्विंटलचे दर ४२०० ते ५६०० रुपयांपर्यंत गेला आहे. त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. 

मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. हंगामाच्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील तांदळाची आवक सुरू झालेली आहे. मात्र पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका बसल्याने उत्पादनाचा दर्जा कमी झालेला आहे. बिगर बासमती तांदळाची परदेशातून असलेल्या मागणीमुळे दरवाढ झाली आहे. 

तांदळाच्या निर्यातीत भारताचे स्थान पहिल्या क्रमांकाचे आहे. विदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे तांदळाचे उत्पादन कमी झाले असल्याचे नागपूर किरकोळ किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. या शिवाय गहू, धान्य, खाद्य तेलाचे भाव मागणी अभावी स्थिरावलेले आहेत. एसटी बंद असल्याने ग्राहकांची बाजारातील वर्दळही कमी झालेली असल्याने सर्वच धान्याचे भाव स्थिरावलेले आहेत. 

डाळींवरील निर्बंध हटविले 
केंद्र सरकारने दोन जुलैला देशात डाळीच्या साठ्यावरील निर्बंध मागे घेतले आहेत. या निर्णयाचा देशातील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. केंद्र सरकारने डाळीच्या आयातीच्या निर्णयाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मसूरचे आयात शुल्क कमी केले आहे. तसेच साठ्याचे विवरण देण्याची सक्तीही सरकारने केलेली आहे. येत्या काही दिवसांत नवीन पीक बाजारात येणार आहे. त्यात सरकारने आयात करण्याच्या मुदतीत वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यांच्या पिकांना योग्य किमती मिळणार नसल्याचा आरोप दी होलसेल ग्रेन ॲण्ड सीड्स मर्चेंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी केला आहे.  
 


इतर अॅग्रो विशेष
पशुसंवर्धन विभागाची यंत्रणाच आजारी अमरावती : सरकारकडून शेतीपूरक पशुपालनासाठी...
पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या उरकल्यापुणे : गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार...
जमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...
‘मध क्लस्टर’ निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत...नाशिक : मधमाशीपालन हे अतिरिक्त रोजगाराचे साधन...
विलंब ‘एफआरपी’चे व्याज  कारखान्यांना...नांदेड : शेतकऱ्यांसोबत बेकायदा करार करून एफआरपीचे...
सोयाबीनसाठी चीनची अमेरिकेवर मदार? पुणे ः ब्राझील आणि अर्जेंटिनात यंदा सोयाबीन...
राज्यात गारठा पुन्हा वाढणार पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
महावितरण विरोधात कऱ्हाडमध्ये शुक्रवारी...कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांना बोगस, चुकीची...
द्राक्ष दराच्या निर्णयाची अंमलबजावणी...नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष मालाच्या उत्पादन...
यंदा डाळिंब निर्यातदार  शेतकरी...सांगली ः राज्यातून डाळिंबाची निर्यात वाढण्यासाठी...
फळबाग लागवडीसाठी  आता सुधारित योजना पुणे ः फलोत्पादन वाटचालीत रोहयो फळबाग लागवडीनंतर...
कोविडमुक्त गाव अभियान पुणे विभागातही...पुणे : जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने...
ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामांबाबत...अकोला ः राज्यातील ग्रामसेवकांकडे असलेली अतिरिक्त...
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
तेलकट डागविरहित डाळिंब अन् बारमाही...तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे...
भात उत्पादक शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल...गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ...
उसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलनसांगली ः तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत...
चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणीचिखलदरा, जि. अमरावती : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात...