agriculture news in Marathi, rich of claim against news Chanel | Agrowon

वृत्तवाहिनीविरोधात हक्कभंग
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 मार्च 2018

मुंबई  : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात कथित लाच घेतल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसारित केल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी (ता. १) विधान परिषदेत उमटले. या वेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधिमंडळ कामकाजावर झालेला आरोप अतिशय गंभीर असल्याचे सांगत संबंधितांविरोधात हक्कभंग मांडण्याची सूचना केली. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी हे वृत्त प्रसारित करणाऱ्या न्यूज १८ लोकमत या वाहिनीविरोधात, तसेच एचडीआयएल या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पुरंदरे यांच्याविरोधात हक्कभंग ठराव मांडला.

मुंबई  : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात कथित लाच घेतल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसारित केल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी (ता. १) विधान परिषदेत उमटले. या वेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधिमंडळ कामकाजावर झालेला आरोप अतिशय गंभीर असल्याचे सांगत संबंधितांविरोधात हक्कभंग मांडण्याची सूचना केली. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी हे वृत्त प्रसारित करणाऱ्या न्यूज १८ लोकमत या वाहिनीविरोधात, तसेच एचडीआयएल या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पुरंदरे यांच्याविरोधात हक्कभंग ठराव मांडला. या ठरावावर विशेषाधिकार समितीने हे अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय द्यावा, असे आदेश सभापतींनी दिले. 

‘‘अशाप्रकारचे कटकारस्थान करून विधिमंडळात आता सत्ताधाऱ्यांनी कमकुवत राजकारण सुरू केले असेल, तर त्याचा शेवट विरोधी पक्षच करेल असे सांगत यापुढे रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची ध्वनिफीत बाहेर काढणार. विधिमंडळाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या बातम्या प्रसारित करणारी वाहिनी, तसेच आरोप करणाऱ्या व्यक्तींविरोधात या सभागृहात एकमताने ठराव व्हायला हवा.आपण कोणत्याही अग्निपरीक्षेला तयार आहोत. मंत्र्यांवर पुराव्यानिशी केलेल्या आरोपांचीही खुली चौकशी करावी आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व व्यक्ती आणि वाहिनीच्या संपादकांसह सगळ्यांचीच नार्को चाचणी व सखोल चौकशी करावी,’’ अशी मागणी मुंडे यांनी केली.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंडे यांनी सरकारवर केलेले आरोप फेटाळत, सरकार काहीही मुद्दाम करत नाही असे स्पष्ट केले. ‘‘विरोधी पक्षनेत्यांविरोधात हे कटकारस्थान असून, यासाठी फक्त संपादक, पत्रकारांनाच जबाबदार न धरता त्या माध्यमाच्या मालकांवरही कारवाई करा. याविरोधात हक्कभंग दाखल करणार आहे,’’ असे काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनीही धनंजय मुंडे यांच्या मागे असणारा जनाधार खुपत असल्यामुळेच अशाप्रकारे आरोप होत आहेत, असे स्पष्ट केले. 

शेकापचे जयंत पाटील म्हणाले, की सत्यतेची पडताळणी न करता अशाप्रकारचे वृत्त दाखवणे म्हणजे सभागृहाचा आणि सदस्यांचा अपमान आहे. शिवसेनेचे अनिल परब यांनीही अशा प्रकारचे वृत्त सभागृहावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. याविरोधात एकमुखी ठराव व्हावा, अशी मागणी केली. 

सभागृह नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, की पुराव्याचा आधार नसताना आरोप करू नये. मंत्र्यांना वेगळा न्याय का? या वेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप करत गोंधळ केला, त्यामुळे सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

परिचारकांविरोधात ठराव?
सभागृहाचे कामकाज सुरू होताच शिवसेनेचे अनिल परब यांनी प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेतल्यासंदर्भात आक्षेप घेतला. निलंबन मागे घेण्याचा ठराव मागे घ्यावा, तसेच त्यांना बडतर्फ करून नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी परब यांनी केली. यावर निर्णय देताना सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी परिचारक यांचे निलंबन कायम ठेवण्याबाबत ठराव मांडण्याच्या सूचना परब यांना दिल्या.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...