agriculture news in marathi Rifle expert in search of Man-eater leopard | Agrowon

पुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार नरभक्षक बिबट्याचा माग

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

आष्टी तालुक्यात बिबट्याला शोधण्यासाठी पुणे येथील राणाज रायफल क्लबची टीम वनविभागाच्या मदतीला आली आहे. टीममधील रायफल एक्स्पर्ट या भागातील बिबट्याचा वावर शोधणार आहेत.

आष्टी, जि. बीड : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरभक्षक बिबट्याने आठवडाभरात तीन बळी घेतल्याने शहर व परिसरात प्रचंड दहशत आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत. याच परिसरात बिबट्या दबा धरून बसला असल्याचा अंदाज असून, त्याला शोधण्यासाठी पुणे येथील राणाज रायफल क्लबची टीम वनविभागाच्या मदतीला आली आहे. टीममधील रायफल एक्स्पर्ट या भागातील बिबट्याचा वावर शोधणार आहेत.

रविवारी (ता. २९ नोव्हेंबर) रोजी तालुक्यातील जोगेश्‍वरी पारगाव येथे बिबट्याने सुरेखा भोसले या महिलेवर हल्ला करून ठार केल्यानंतर वन विभाग या बिबट्याचा शोध घेत आहे. तीन दिवस उलटल्यानंतरही अद्याप वनविभागाला बिबट्याचा शोध लागलेला नाही. वनविभागाच्या सर्व टीम, गावकरी, स्वयंसेवक पथके यांना गुंगारा देण्यात बिबट्या यशस्वी होत आहे. 

वनविभागाचे शंभरहून अधिक कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असून, घटना घडली त्या परिसरात पिंजरे लावून त्यामध्ये ट्रांक्युलायझर टीमचे शूटर बसविण्यात आले आहेत. बिबट्यासाठीचे भक्ष्य बोकड पिंजऱ्या बाहेर ठेवून त्याला बेशुद्ध करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे.

बिबट्याला चकविण्यासाठी मानवी बाहुल्या तयार करून विविध ठिकाणी ठेवण्यात आल्या असून, या सर्व उपायांना बिबट्याने गुंगारा दिल्याचे स्पष्ट होत आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील या बिबट्याला शोधण्यासाठी राणाज रायफल क्लबचे संचालक डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्यासह सदस्यांची टीम जोगेश्‍वरी पारगाव येथे दाखल झाली आहे.

यापूर्वी बिबट्याच्या शोधमोहिमेसाठी काम करण्याचा या टीमला अनुभव असून, विशेषतः रात्रीच्या वेळी बिबट्याचा माग काढण्यात ही टीम एक्स्पर्ट असल्याचे सांगण्यात येते. सोबतच आजूबाजूच्या गावकऱ्यांनीही दक्ष राहावे, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी श्‍याम शिरसाठ यांनी केले आहे.


इतर बातम्या
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...