अक्कलपाडा धरणाच्या उजवा कालव्याचे पाणी सोडा ः भदाणे

धुळे : अक्कलपाडा धरणात बऱ्या‍पैकी जलसाठा झाला आहे. जलसाठ्याचे पाणी कोरडवाहू शेतकऱ्यांना मिळावे. उजवा कालव्याचे पाणी शेतकऱ्यांसाठी तत्काळ सोडावे.
Right of Akkalpada Dam Release canal water: Bhadane
Right of Akkalpada Dam Release canal water: Bhadane

धुळे : ‘‘अक्कलपाडा धरणात बऱ्या‍पैकी जलसाठा झाला आहे. जलसाठ्याचे पाणी कोरडवाहू शेतकऱ्यांना मिळावे. उजवा कालव्याचे पाणी शेतकऱ्यांसाठी तत्काळ सोडावे, अशी मागणी जिल्हाधिकारी संजय यादव व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी निवेदनाद्वारे केली. 

निवेदनानुसार, धुळे तालुक्यात सततचा कोरडा व ओला दुष्काळ सुरू आहे. शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी अतिपावसामुळे खरिपाची सर्वच पिके वाया गेली. कापूस थोडाफार येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. बोंड अळीमुळे कापसाचेही अपेक्षित उत्पादन हाताशी आले नाही. पिके उपटून फेकावी लागली. महाआघाडीचे सरकार मूग गिळून बसले आहे. त्यांना शेतकऱ्यांची पर्वा नाही. महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतेही अनुदान मिळालेले नाही. 

बिकट परिस्थितीत शेतकरी सापडलेला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी आहेत, त्यांनी रब्बीच्या पिकांची लागवड केली. त्यातच महावितरण कंपनी दिवसा वीज देत नाही. रात्री-अपरात्री शेतकरी शेतात भरणा करत आहे. अशा अनेक अडचणी तोंड देत शेतकरी जगत आहेत.

सद्या अक्कलपाडा धरणात जलसाठा आहे. उजव्या कालव्यास पाणी सोडल्यास कोरडवाहू शेतकऱ्याला रब्बी पीक घेता येणार आहे. लोणखेडी व परिसरातील शेतकऱ्यांसह भदाणे यांनीअक्कलपाडा उजवा कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com