Agriculture news in Marathi, The right movement of 'Swabhimani' started | Agrowon

‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सन २०१७-१८ मधील जाहीर दरातील फरकाची रक्कम व २०१८-१९ मधील एफआरपीची थकीत रक्कम व्याजासह मिळवणे, नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी, यासाठी सोमवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सन २०१७-१८ मधील जाहीर दरातील फरकाची रक्कम व २०१८-१९ मधील एफआरपीची थकीत रक्कम व्याजासह मिळवणे, नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी, यासाठी सोमवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सन २०१७-१८ मधील जाहीर दरातील फरकाची रक्कम व २०१८-१९ मधील एफआरपीची थकीत रक्कम व्याजासह मिळवणे, जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे व मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून संपूर्ण कर्जमाफी व वीजबिलमाफी तातडीने जाहीर करावी, तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागण्या पूर्ण करण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

या वेळी जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले, ‘‘आमच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल याच्यासमवेत चर्चा झाली. त्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली आहे. थकीत एफआरपीसाठी कारखानदार, तसेच संघटनेच्या समवेत बैठक घेतली जावी अशी मागणी केल्यावर. साखर आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.’’

सरकार स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मागण्या मान्य करून घेणार आहे. मात्र उसाच्या थकीत एफआरपीसाठी तोडगा न काढल्यास आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या वेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, उपाध्यक्ष देवानंद पाटील, धनंजय महामुलकर, दादासाहेब यादव, रमेश पिसाळ, बापूराव साळुंखे, प्रमोद जगदाळे, संदीप पवार, नितीन यादव, जनार्दन आवारे, मदन साळुंखे, संजय जाधव आदी उपस्थित होते. 
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...