ओबीसी समाजाला हक्कापासून  वंचित ठेवता येणार नाही : भुजबळ 

ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही आणि ही बाजू आपल्याला न्यायालयात प्रखरपणे मांडावी लागणार असल्याचे मत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
From the right to the OBC community Can't be deprived: Bhujbal
From the right to the OBC community Can't be deprived: Bhujbal

नाशिक : ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही आणि ही बाजू आपल्याला न्यायालयात प्रखरपणे मांडावी लागणार असल्याचे मत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.        सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. या बाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयात राज्य सरकार आपली बाजू मांडणार आहे त्या पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ, दिल्लीतील ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्य शासनाचे सरकारी वकील, सर्व अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते. दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या या बैठकीला खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार समीर भुजबळ, ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी, ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, सरकारी वकील ॲड. राहुल चिटणीस, ॲड. सचिन पाटील उपस्थित होते.             ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील सर्व बाबींची राज्य सरकार पूर्तता करेल, अशी माहिती देखील त्यांनी या वेळी दिली. होणाऱ्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी, समता परिषदेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ खा. पी. विल्सन आणि भंडारा जिल्ह्यातील ओबीसी इंटर्व्हेनरच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. दरम्यान, समीर भुजबळ यांनी रविवारी (ता.१२) रोजी दिल्ली येथे पी. विल्सन यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत चर्चा केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com