नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्य
बातम्या
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार बजावणार हक्क
बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर, सिंदखेड राजा, खामगाव, मेहकर व जळगाव जामोद अशा सात विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (ता. २१) सकाळी मतदानाला सुरवात होणार असून, या वेळी २० लाख ३९४३५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर, सिंदखेड राजा, खामगाव, मेहकर व जळगाव जामोद अशा सात विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (ता. २१) सकाळी मतदानाला सुरवात होणार असून, या वेळी २० लाख ३९४३५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेसाठी ११ हजार ३१५ कर्मचारी मतदान केंद्रांवर राहणार आहेत. प्रत्येक मतदान चमुमध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी, पोलिस कर्मचारी आदींचा समावेश करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात एकूण २१६ क्षेत्र असून त्याकरिता प्रत्येक क्षेत्राकरिता एक याप्रमाणे २१६ क्षेत्रीय अधिकारी व २७ राखीव क्षेत्रिय अधिकारी असे एकूण २४३ क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यामध्ये एकूण ६५३ मतदान केंद्रे मुस्लिम बहुल असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रांवर महिला कर्मचाऱ्याची नियुक्तीदेखील करण्यात आलेली आहे. विधानसभा मतदारसंघ स्तरावर साहित्यवाटप करण्यासाठी परिपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये मतदार चिठ्ठ्यांचे वाटप व मतदान माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आलेले आहे.
प्रत्येक मतदान केंद्रांवर १३ सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये रॅम्प, पिण्याचे पाणी, फर्निचर, विद्युत व्यवस्था, मदत केंद्र, प्रसाधन गृह आदींचा समावेश आहे. तसेच दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर, स्वयंसेवक, ब्रेल बॅलेट पेपर, भिंग, दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहनांची सुविधा पुरविण्यात येणार आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान चमू मतदान केंद्रावर पोचल्याबाबतचा अहवाल त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी अभिरूप मतदान व दर दोन तासांनी किती टक्के महिला व पुरुषांचे मतदान केंद्रांवर मतदान झालेले आहे, यासाठी पीडीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात २० लक्ष ३९ हजार ४३५ मतदारांची नोंद असून जास्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावतील, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यात एकूण २ हजार २६३ मतदान केंद्रांमार्फत ही निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यापैकी १० टक्के मतदान केंद्रांवर मतदान हालचालीचे लाईव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.
- 1 of 1501
- ››