पामतेलातील तेजीने खाद्यतेल दरवाढीला फोडणी  The rise in edible oil prices has led to a sharp rise in palm oil prices
पामतेलातील तेजीने खाद्यतेल दरवाढीला फोडणी  The rise in edible oil prices has led to a sharp rise in palm oil prices

पामतेलातील तेजीने खाद्यतेल दरवाढीला फोडणी 

देशात खाद्यतेलाचे दर कमी न होण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी कारणीभूत ठरत आहे. त्यातही पामतेल बाजारातील तेजी देशातील दरालाही फोडणी देत आहे.

पुणे : देशात खाद्यतेलाचे दर कमी न होण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी कारणीभूत ठरत आहे. त्यातही पामतेल बाजारातील तेजी देशातील दरालाही फोडणी देत आहे. कच्च्या पामतेलाचे दर हे २०२० मध्ये दोन हजार रिंगिट (रिंगिट हे मलेशियाचे चलन आहे) होते. त्यात वाढ होत कच्च्या पामतेलाचे दराने ऑक्टोबर २०२१ मध्ये पाच हजार रिंगिटचा टप्पा गाठला. मलेशिया पाम ऑईल बोर्डानुसार २०१९ मध्ये मलेशियात पामतेलाचे उत्पादन १९८.६ लाख टन पामतेल उत्पादन झाले होते. २०२० मध्ये मजूर टंचाईमुळे उत्पादनात ३.६ टक्क्यांनी घट होऊन १९१.४ लाख टन झाले. भारताने आयात शुल्कात कपात केल्याने येथील तेलाचा बाजार आणखी मजबूत बनला.  मागील पाच ते सहा महिन्यांपासून सोयाबीनचा मोठा तुटवडा होता. त्यामुळे मागील दोन ते तीन महिन्यांपासून बंद असलेले प्रक्रिया प्लांट्स सुरू होत आहेत. त्यामुळे बाजारात सोयाबीनला मागणी वाढत आहे. सरकारने साठा मर्यादा, आयात शुल्क लावले असले तरी उद्योगांना गरज असल्याने खरेदी होत आहे. त्यातच चांगला दर मिळाल्या शिवाय सोयाबीन न विकण्याचा निर्धार अनेक शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे बाजारात आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे बाजार समित्यांच्या सूत्रांनी सांगितले. 

कसे आहेत तेलांचे दर  ग्राहक मंत्रालयाने दिलेल्या आकड्यांवरून असे दिसते की तेलांचे दर काही करता कमी होत नाहीत. एक ऑक्टोबरला सोयाबीन तेलाचे किरकोळ दर १५५.६५ रुपये प्रति किलो होते ते दसऱ्याच्या दिवशी, १५ ऑक्टोबरला १५५.१० रुपयांवर स्थिरावले होते. शेंगदाणा तेल १८१.४२ रुपयांवरून १८२.३५ रुपये, मोहरी तेल १८३ रुपयांवरून १८७ रुपये, सूर्यफूल तेल १६९.६ रुपयांवरून १६९.१ रुपये आणि पामतेल १३१.५६ रुपयावरून १३४.०७ रुपयांवर गेले. म्हणजेच खाद्यतेल आणि तेलबियांवर साठा मर्यादा आणि खाद्यतेल आयात शुल्कात कपात करूनही तेलांचे दर कमी झालेले नाहीत. मात्र सोयाबीनचे सरासरी दर ५००० ते ६२०० रुपयांवरून ४५००० ते ५५०० रुपयांपर्यंत खाली आले. सोयाबीनचा दर गेल्या पंधरा दिवसांत सरासरी ५०० ते ८०० रुपयांनी घसरला आहे. 

पामतेल निर्यातीची स्थिती  मलेशिया सरकारने नोव्हेंबर महिन्यात पामतेल निर्यातीसाठीचे शुल्क ८ टक्के ठेवले आहे. त्यामुळे निर्यातीसाठीचे रेफरंस भाव हे ४५२३ रिंगिट म्हणजेच १०८४ डॉलर प्रतिटन आले. हा दर ऑक्टोबरच्या तुलनेत ३६१.८६ रिंगिटने वाढले आहेत. तर इंडोनेशियातून सप्टेंबर महिन्यात पाम तेलाच्या निर्यातीत ऑगस्टच्या तुलनेत २७.५ टक्क्यांनी घट होऊन १९.६५ लाख टनांवर घसरली. त्यामुळे पामतेलाचे दर तेजीत आहेत. त्यातच आय़ातीसाठीचा खर्चही वाढला. त्यामुळे आणखी पैसे मोजावे लागत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com