Agriculture News in Marathi The rise in edible oil prices has led to a sharp rise in palm oil prices | Agrowon

पामतेलातील तेजीने खाद्यतेल दरवाढीला फोडणी 

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 ऑक्टोबर 2021

देशात खाद्यतेलाचे दर कमी न होण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी कारणीभूत ठरत आहे. त्यातही पामतेल बाजारातील तेजी देशातील दरालाही फोडणी देत आहे.

पुणे : देशात खाद्यतेलाचे दर कमी न होण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी कारणीभूत ठरत आहे. त्यातही पामतेल बाजारातील तेजी देशातील दरालाही फोडणी देत आहे. कच्च्या पामतेलाचे दर हे २०२० मध्ये दोन हजार रिंगिट (रिंगिट हे मलेशियाचे चलन आहे) होते. त्यात वाढ होत कच्च्या पामतेलाचे दराने ऑक्टोबर २०२१ मध्ये पाच हजार रिंगिटचा टप्पा गाठला. मलेशिया पाम ऑईल बोर्डानुसार २०१९ मध्ये मलेशियात पामतेलाचे उत्पादन १९८.६ लाख टन पामतेल उत्पादन झाले होते. २०२० मध्ये मजूर टंचाईमुळे उत्पादनात ३.६ टक्क्यांनी घट होऊन १९१.४ लाख टन झाले. भारताने आयात शुल्कात कपात केल्याने येथील तेलाचा बाजार आणखी मजबूत बनला. 

मागील पाच ते सहा महिन्यांपासून सोयाबीनचा मोठा तुटवडा होता. त्यामुळे मागील दोन ते तीन महिन्यांपासून बंद असलेले प्रक्रिया प्लांट्स सुरू होत आहेत. त्यामुळे बाजारात सोयाबीनला मागणी वाढत आहे. सरकारने साठा मर्यादा, आयात शुल्क लावले असले तरी उद्योगांना गरज असल्याने खरेदी होत आहे. त्यातच चांगला दर मिळाल्या शिवाय सोयाबीन न विकण्याचा निर्धार अनेक शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे बाजारात आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे बाजार समित्यांच्या सूत्रांनी सांगितले. 

कसे आहेत तेलांचे दर 
ग्राहक मंत्रालयाने दिलेल्या आकड्यांवरून असे दिसते की तेलांचे दर काही करता कमी होत नाहीत. एक ऑक्टोबरला सोयाबीन तेलाचे किरकोळ दर १५५.६५ रुपये प्रति किलो होते ते दसऱ्याच्या दिवशी, १५ ऑक्टोबरला १५५.१० रुपयांवर स्थिरावले होते. शेंगदाणा तेल १८१.४२ रुपयांवरून १८२.३५ रुपये, मोहरी तेल १८३ रुपयांवरून १८७ रुपये, सूर्यफूल तेल १६९.६ रुपयांवरून १६९.१ रुपये आणि पामतेल १३१.५६ रुपयावरून १३४.०७ रुपयांवर गेले. म्हणजेच खाद्यतेल आणि तेलबियांवर साठा मर्यादा आणि खाद्यतेल आयात शुल्कात कपात करूनही तेलांचे दर कमी झालेले नाहीत. मात्र सोयाबीनचे सरासरी दर ५००० ते ६२०० रुपयांवरून ४५००० ते ५५०० रुपयांपर्यंत खाली आले. सोयाबीनचा दर गेल्या पंधरा दिवसांत सरासरी ५०० ते ८०० रुपयांनी घसरला आहे. 

पामतेल निर्यातीची स्थिती 
मलेशिया सरकारने नोव्हेंबर महिन्यात पामतेल निर्यातीसाठीचे शुल्क ८ टक्के ठेवले आहे. त्यामुळे निर्यातीसाठीचे रेफरंस भाव हे ४५२३ रिंगिट म्हणजेच १०८४ डॉलर प्रतिटन आले. हा दर ऑक्टोबरच्या तुलनेत ३६१.८६ रिंगिटने वाढले आहेत. तर इंडोनेशियातून सप्टेंबर महिन्यात पाम तेलाच्या निर्यातीत ऑगस्टच्या तुलनेत २७.५ टक्क्यांनी घट होऊन १९.६५ लाख टनांवर घसरली. त्यामुळे पामतेलाचे दर तेजीत आहेत. त्यातच आय़ातीसाठीचा खर्चही वाढला. त्यामुळे आणखी पैसे मोजावे लागत आहेत.  


इतर बातम्या
तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा...औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील...
शेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण...
राज्याच्या किमान तापमानात घट पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश...
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे -...लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची...
शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग  नीरा...नागपूर ः राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या...
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का कमीचनगर ः जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला अजूनही फारसा...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
किन्ही येथे धान पुंजणे जाळल्याने आठ...भंडारा ः साकोली तालुक्‍यातील किन्ही येथे १९...
पालघरचा मंजूर विकासनिधी सातव्यांदा...पालघरः मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याच्या...
शेतीपंपाच्या वीज जोडण्या खंडित...नाशिक: जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील मका...
मराठवाड्याच्या वाट्याला ९ कोटी ९० लाख...औरंगाबाद : राज्यातील मागेल त्याला शेततळे...
सोलापूर जिल्ह्याला शेततळ्यांचे रखडलेले...सोलापूर ः राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे या...
अकोला जिल्ह्यात करडईची साडेसातशे...अकोला ः तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन...
नांदेड विभागात २१ कारखाने सुरुनांदेड ः नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर)...
सांगली जिल्ह्यात महिन्यात साडे पंधरा...सांगली ः जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा १३ साखर...