दोन दिवसांत पेट्रोल ५८, तर डिझेल ६४ पैशांनी महाग

महिनाभरापासून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत पेट्रोल आणि डिझेल दराने उच्चांक गाठला. पेट्रोलमध्ये ५८, तर डिझेलमध्ये ६४ पैशांनी वाढ झाली.
दोन दिवसांत पेट्रोल ५८, तर डिझेल ६४ पैशांनी महाग
दोन दिवसांत पेट्रोल ५८, तर डिझेल ६४ पैशांनी महाग

मुंबई : कोरोना काळात उपनगरी रेल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी बंद असताना खासगी वाहनांमधून प्रवास करणे वाढत्या इंधन दरांमुळे जिकिरीचे झाले आहे. महिनाभरापासून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत पेट्रोल आणि डिझेल दराने उच्चांक गाठला. पेट्रोलमध्ये ५८, तर डिझेलमध्ये ६४ पैशांनी वाढ झाली.

२६ जानेवारीला इंधनदरात ३३ ते ३४ पैशांनी वाढ झाली. बुधवारीही दरवाढ कायम राहिली. गेल्या महिन्याभरातील ही सहावी दरवाढ आहे. मंगळवारी पेट्रोल दरात ३४, तर डिझेल दरात ३७ पैशांची वाढ झाली; तर बुधवारी पेट्रोलच्या दरात २४, तर डिझेलच्या दरात २७ पैशांनी वाढ झाल्याने पेट्रोलचा प्रतिलिटर दर ९२.८६ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर दर ८३.३० रुपये झाला.

याआधी १८ व १९ जानेवारी रोजी पेट्रोलच्या दरात ४८, तर डिझेल दरात ५३ पैशांची वाढ झाली. २० आणि २१ जानेवारी असे दोन दिवस हे दर स्थिर राहिले. त्यानंतर पुन्हा २२, २३ जानेवारी या दोन दिवसांत पेट्रोल ४८, तर डिझेल ५३ पैशांनी वाढले. दर स्थिर झाल्यानंतर २६ जानेवारीपासून पुन्हा वाढ झाली. आजवरच्या दरवाढीमुळे पेट्रोल १.५४ रुपयांनी महाग झाले, तर डिझेल २.२४ रुपयांनी महाग झाले आहे. बुधवारी राज्यभरात पेट्रोलचा सर्वाधिक ९४.८४ रुपये दर नांदेड जिल्ह्यात, तर डिझेलचा सर्वाधिक ८४.७६ रुपये दर अमरावतीत होता.  

राज्यातील जिल्ह्यांमधील दर (प्रति लिटर/रुपयांत)    
जिल्हे पेट्रोल डिझेल
अमरावती ९४.२९ ८४.७६
बीड ९४.४९ ८३.६३
गोंदिया ९४.४ ८३.२१
मुंबई उपनगर ९३.२ ८३.४५
नांदेड ९४.८४ ८३.९८
जालना ८३.१० ८३.१०
परभणी ९४.५२ ८३.६४
रत्नागिरी ९४.२७ ८३.४०
सिंधुदुर्ग ९४.४० ८३.५५

चंडीगडमध्ये सर्वांत स्वस्त इंधन मुंबईतील पेट्रोलचा दर ९२.८६ रुपये आहे. त्याप्रमाणे चेन्नई ९४.३०, दिल्ली ८६.३०, कोलकाता ८७.६९, बेंगळूरु ९४.५०, चंडीगड ८३.९ रुपये; तर डिझेलच्या दरांमध्ये मुंबई ८३.३० रुपये, त्याप्रमाणे चेन्नई ८२.३०, दिल्ली ७६.४८, कोलकाता ८०.८, बंगळूर ८२.००, चंडीगड ७६.२३ रुपये दर होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com