यवतमाळमध्ये तुरीच्या आवकेत वाढ

यवतमाळमध्ये तुरीच्या आवकेत वाढ
यवतमाळमध्ये तुरीच्या आवकेत वाढ

यवतमाळ : हंगाम संपत येत असला तरी तुरीचे हमीभाव केंद्र सुरू झाले नाही. खासगी बाजारात आतापर्यंत ६९ हजार ९१३ क्‍विंटल तुरीची खरेदी झाली आहे. खविसंच्या मागणीवर तोडगा न निघाल्याने अजूनही अद्याप तुरीची नोंदणी सुरू झाली नसल्याची स्थिती आहे.

गेल्या वर्षी मार्केटिंग फेडरेशनचे ११ व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे चार अशा एकूण १६ केंद्रांवर तुरीची खरेदी करण्यात आली. यंदा बाजारात तुरीची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने सुरू आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नाफेड मार्फत केंद्र सुरू करण्याची मागणी होती. मात्र, जुनी थकीत न दिल्याने खविसंने खरेदीवर बहिष्कार टाकला.  

शासनाने थकबाकी संदर्भात अद्याप निर्णय घेतला नसल्याने येणाऱ्या काळात आणखी अडचण वाढण्याची शक्‍यता आहे. तूर खरेदी सुरू होऊन बरेच दिवस झाले मात्र अद्याप खरेदी विक्री संघाच्या मागणीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने खासगी बाजारात तुरीचे दर पडले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर तुरीचे दर पाच हजारावर गेले. त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. 

केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. बाजारात भाव कमी असल्याने तूर विकता येत नाही तर केंद्र बंद असल्याने नवीन समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. यवतमाळ बाजार समितीत आतापर्यंत ६९ हजार ९१३ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.

माल ठेवण्याची अडचण मागील वर्षी तुरीची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. हा माल अद्यापही गोडाऊनमध्ये शिल्लक आहे. यंदाही बऱ्यापैकी तुरीचे उत्पन्न झाले आहे. माल खरेदी सुरू झाल्यास तूर ठेवण्याचा प्रश्‍न उपस्थित होणार आहे. यासंदर्भात अद्यापही निर्णय न झाल्याने खरेदी सुरू झाल्यास फार दिवस खरेदी होणार याबाबत शंका आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com