agriculture news in marathi Rise in turmeric demand for Diwali | Agrowon

दिवाळीमुळे हळदीला उठाव

वृत्तसेवा
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021

दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे. फराळ आणि प्रक्रिया उद्योग तसेच हॉटेल्स, रेस्टारेंट्समधूनही उठाव मिळत आहे. त्यामुळे देशभरातील बाजारात हळदीच्या दरात १०० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे.

पुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे. फराळ आणि प्रक्रिया उद्योग तसेच हॉटेल्स, रेस्टारेंट्समधूनही उठाव मिळत आहे. त्यामुळे देशभरातील बाजारात हळदीच्या दरात १०० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. पुढील काळात हळदीच्या दरात जास्त तेजी-मंदीची शक्यता नाही, असे जाणकारांनी सांगितले.

दिवाळीमुळे सुकामेवा आणि मसाल्यांना मागणी वाढली आहे. तसेच हळदीला उठाव राहिल्याने आवकही झाली. देशातील महत्त्वाच्या हळद बाजारांत सोमवारपासून हळदीच्या दरात काहीशी सुधारणा झाली. राज्यातील काही बाजार समित्या दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बंद होत्या. मात्र नांदेड आणि वसमत बाजार समित्यांत हळदीच्या दरात ५० ते १०० रुपयांपर्यंत वाढ झाली होती. ई-रोड बाजार समितीत हळदीची आवक ३ हजार ८०० पोत्यांची आवक होती. निजामाबाद बाजारात एक बजार पोत्यांची आवक होऊन दरात काहीशी सुधारणा नोंदली गेली. 

बाजारातील सूत्रांच्या मते देशातील महत्त्वाच्या हळद खरेदी केंद्रांवर माल भरपूर आहे तसेच निजामाबाद पट्ट्यात डिसेंबरपासून नवीन हळदीची आवक होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे बाजार समित्यांत हळदीच्या दरात जास्त तेजी-मंदीची शक्यता कमीच आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या पावसाने महाराष्ट्रातील पिकाला मोठा फटका बसला. तसेच हळद उत्पादक पट्ट्यात अनेक ठिकाणी सततचा पाऊस, मूळकूज आणि कीड-रोगाने उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. सूत्रांच्या मते देशात यंदा हळद उत्पादनात १५ टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे.

...असे आहेत दर
बाजार समित्यांत हळदीची आवक ही गेल्याकाही दिवासांत वाढली. मात्र मागणी चांगली राहिल्याने दरात सुधारणा होऊन ४५०० ते ८६९९ रुपयांपर्यंत प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला. महाराष्ट्रात सरासरी दर ५५०० ते ८५०० रुपयांदरम्यान मिळाला. तर तमिळनाडूत हळदीला ६००० ते ८६९९ रुपयांपर्यंत दर मिळाला. 

प्रतिक्रिया...
देशातील विविध भागांत हळद पिकाला पावसाचा कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. यंदा देशातील हळद उत्पादनात १० ते १२ टकक्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज आहे. सध्या दिवाळीमुळे दरात २०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. पुढील काळात दर पुन्हा स्थिर राहतील, अशी शक्यता आहे.
- शुभम झावर, हळद व्यापारी आणि उद्योजक, निजामाबाद, तेलंगणा


इतर अॅग्रोमनी
बाजारातील असंतुलनामुळे सोयाबीनची दरवाढपुणे ः जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दरात झालेली...
कापूस आवक वाढूनही दर स्थिरावले जळगाव ः  कापड उद्योगातील वाढती महागाई व...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः आवक कमी मात्र मागणी जास्त असल्याने देशातील...
सोयाबीन दरात सुधारणा पुणे ः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा...
आयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र...
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
जगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...