agriculture news in Marathi rising cold in khandesh Maharashtra | Agrowon

विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेय

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 डिसेंबर 2019

पुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाल्याने थंडी पसरण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भापाठोपाठ खानदेशातही थंडी वाढू लागली आहे. खानदेशातील धुळे येथील कृषी महाविद्यालयात ११.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे कृषी महाविद्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
 

पुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाल्याने थंडी पसरण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भापाठोपाठ खानदेशातही थंडी वाढू लागली आहे. खानदेशातील धुळे येथील कृषी महाविद्यालयात ११.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे कृषी महाविद्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
 

गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी समुद्रात तयार झालेले पवन चक्रीवादळ आणि त्यापाठोपाठ तयार झालेले दुसरे कमी दाबाचे क्षेत्र यामुळे राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान होते. त्यामुळे राज्यातील किमान तापमान जवळपास २४-२५ अंश सेल्सिअसपर्यत गेले होते. यामुळे राज्यातील थंडी गायब झाल्याची स्थिती होती.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्रातील चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने राज्यात पुन्हा हवामान कोरडे होण्यास सुरुवात झाली. यामुळे थंडीने पुन्हा जम बसविण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक भागांत थंडी वाढू लागली असून किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने कमी झाले आहे.

राज्यात कोरडे हवामान झाले असून उत्तरेकडूनही काही प्रमाणात वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खानदेशातील धुळे, जळगाव या भागात थंडी वाढू लागली आहे. सध्या राज्यात दिवसभर ऊन पडत असले तरी सायंकाळनंतर हवेत गारवा तयार होत आहे. मध्यरात्रीनंतर गारवा वाढत जाऊन पहाटे चांगलीच थंडी पडत असून किमान तापमानात घट होत आहे.

धुळेनंतर विदर्भातील नागपूर, उस्मानाबाद, गोंदिया येथेही ११ अंशांच्या दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली. मुंबई, रत्नागिरी या भागातील 
किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

शनिवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः नगर १४.३ (३), अकोला १३.६, अलिबाग २१.८ (३), अमरावती १४.० (-१), औरंगाबाद १३.७ (२), बीड १४.९ (२), बुलडाणा १४.५, चंद्रपूर १४.२ (१), डहाणू २१.५ (३), गोंदिया ११.४ (-२), जळगाव १४.० (२), धुळे ११.०, कोल्हापूर १९.१ (४), महाबळेश्वर १३.६, मालेगाव १५.२ (४), मुंबई २१.६ (३), नागपूर ११.१ (-२), नांदेड १४.५ (२), नाशिक १४.२ (३), उस्मानाबाद ११.४ (-१), परभणी १२.८ (-१), लोहगाव १६.४ (३), पुणे १४.९ (३), रत्नागिरी २२.४ (२), सांगली १८.९ (४), सातारा १६.३ (३), सोलापूर १९.१ (३), वर्धा १२.९ (-२), यवतमाळ १३.० (-२).


इतर अॅग्रो विशेष
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...
साखर कारखान्यांना लवकरच ‘पॅकेज’मुंबई ः राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांना...
कमी दरात तूर घेऊन विकली हमीभावाने; दोन...यवतमाळ ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दरात...
सेंद्रिय भाजीपाल्याला तयार केले ‘...झुलपेवाडी (जि. कोल्हापूर) येथील चिकोत्रा सेंद्रिय...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...