नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या वाढत्या तक्रारी

नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी केलेले प्रस्तावित क्षेत्र ६१४४९ हेक्टर आहे. मात्र, चालू वर्षी ७३ हजार १०५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी वाढत आहेत. ही संख्या १५० वर गेली आहे.
 Rising complaints of soybean seeds in Nashik district
Rising complaints of soybean seeds in Nashik district

नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी केलेले प्रस्तावित क्षेत्र ६१४४९ हेक्टर आहे. मात्र, चालू वर्षी ७३ हजार १०५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी वाढत आहेत. ही संख्या १५० वर गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम वाया गेलेच, शिवाय आर्थिक व मानसिक नुकसान झाले, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. 

चालू वर्षी सोयाबीन बियाण्यांची दरवाढ झाली. त्यात नंतर पेरण्या करून ते उतरले नाही. बियाणे बदलून मिळावे, अन्यथा नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, कृषी विभागाने अद्याप फक्त तक्रारी तपासल्या आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचे मानसिक व आर्थिक नुकसान झाले आहे. तरीही प्रशासनाने कठोर पावले उचलली नसल्याचे चित्र आहे.

कृषी विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाने तक्रारींची तपासणी केली. त्यात कमी उगवण क्षमता व पेरणीनंतर जोराचा पाऊस, असे बियाणे कमी उगवण्याचे निष्कर्ष काढले. जून महिन्यात पेरणी केल्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याची स्थिती आहे. तक्रारी आहेत. मात्र, काही कंपन्या बियाणे बदलून देण्यास तयार आहेत. तर, काही कंपन्या सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याची स्थिती आहे. याप्रश्नी सरकारने वेळेवर भूमिका न घेतल्यास शेतकरी भरडला जाईल.

कृषी विभागाकडे याबाबत संपर्क साधला. त्यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे अहवाल सादर केला. मात्र, अजून काहीही प्रतिसाद आलेला नाही. तर, काही संतप्त शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी कृषी विभागाकडे संपर्क केला. त्यावेळी थेट ग्राहक मंचाकडे जाऊन तक्रार करण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचे आढळून आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com