Agriculture news in Marathi Rising import duty will affect orange exports | Page 2 ||| Agrowon

आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर होणार परिणाम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

त्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या बांगलादेशने गेल्या पाच वर्षात तब्बल दोनवेळा आयात शुल्क वाढ केल्याने भारतीय निर्यातदारांची चिंता वाढली आहे.

अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या बांगलादेशने गेल्या पाच वर्षात तब्बल दोनवेळा आयात शुल्क वाढ केल्याने भारतीय निर्यातदारांची चिंता वाढली आहे. याचा संत्रा निर्यातीवर देखी व्यापक परिणाम होण्याची भीती वर्तविली जात असून हे भारतीय राजकीय मुत्सद्देगिरीचे अपयश मानले जात आहे.  

विदर्भाचे मुख्य फळपीक अशी संत्र्याची ओळख. सुमारे दीड लाख हेक्‍टरवर विदर्भात संत्रा लागवड आहे. त्यातील सर्वाधिक ९५ ते एक लाख हेक्‍टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. वरुड मोर्शी हे तालुके त्यामुळेच विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जातात. उत्पादित संत्र्याला बाजारपेठ मिळवताना शेतकऱ्यांची दमछाक होते. एखाद्या वर्षी उत्पादन अधिक झाल्यास दर घसरतात तर काहीवेळा कमी दरामुळे शेतकऱ्यांना संत्रा फेकून द्यावा लागतो. 

नागपुरी संत्रा फळांची टिकवणक्षमता कमी असल्याने इतर देशांमधून त्याला मागणी कमी राहते. परिणामी निर्यात होत नाही. नागपुरी संत्राचा एकमेव आणि मोठा आयातदार बांगलादेश आहे. एकूण उत्पादनाच्या दीड लाख टन संत्रा एकट्या बांगलादेशला निर्यात होतो. मांसाहार पचविण्यासाठी  बांगलादेशी नागरिकांची संत्र्याला पसंती राहते. पश्चिम बंगाल मार्गे रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून संत्रा भारतातून बांगलादेशला पोहोचविला जातो. पश्चिम बंगालमधील व्यापारी अमरावती जिल्ह्यातून थेट संत्रा खरेदी करतात. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये संत्रा आणत त्या ठिकाणी निर्याती संदर्भातील कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्याची प्रक्रिया पार पडली जाते. त्यामुळे संत्रा निर्यात विदर्भाऐवजी पश्चिम बंगालमधून होत असल्याचे दस्तऐवजांवरून स्पष्ट होते. 

मोठ्या प्रमाणात नागपुरी संत्र्याची आयात बांगलादेशला होत असतानाही संत्रा फळाच्या निर्यातीबाबत बांगलादेश सरकारने अनेकदा धोरणात बदल केला आहे. पाच वर्षांपूर्वी बांगलादेश सरकारकडून आयात शुल्कात सरसकट दुपटीने वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पाच लाख रुपयांचा संत्रा बांगलादेशला निर्यात करायचा असल्यास त्यावर पाच लाख रुपयांचे आयात शुल्क मोजावे लागत होते. बांगलादेश सरकारच्या या धोरणाचा भारतातून तीव्र विरोध झाला. 

संत्रा उत्पादकांची शिखर संस्था असलेल्या महाऑरेंजने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्य व केंद्र सरकारस्तरावर पाठपुरावा केला. तत्कालीन वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनीदेखील गडकरी यांच्या पाठपुराव्याची दखल घेत बांगलादेश सरकारकडे आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली. परंतु बांगलादेश सरकारने भारत सरकारच्या या विनंतीला धुडकावून लावले. त्यामुळे जशास तसे म्हणून बांगलादेशमधून येणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेण्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.परंतु भारत सरकारने आयात शुल्क वाढीचा कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे मजुरी वाढलेल्या बांगलादेशने शुल्कात कोणतीही कपात केली नाही. या उलट आता पुन्हा नव्याने आयात शुल्कवाढीचा निर्णय घेत भारत सरकारला थेट आव्हान दिल्याची चर्चा संत्रा उत्पादकांमध्ये आहे.

पाच वर्षात बांगलादेश सरकारने आयात शुल्कात दोनवेळा वाढ केली आहे. यापूर्वी तत्कालीन वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात हे शुल्क दुपटीने वाढविण्यात आले होते. ते कमी करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, त्यात यश आले नाही. आता पुन्हा बांगलादेशने शुल्क वाढीचा निर्णय घेतला आहे. याचा संत्रा निर्यातीवर दूरगामी परिणाम होण्याची भीती आहे.  
- श्रीधर ठाकरे, 
कार्यकारी संचालक, महाऑरेंज

आयात शुल्क
प्रति किलो ३१ रुपयांवरून ३८ रुपये ९० पैसे वाढ.


इतर बातम्या
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...