नगरला शेवगा, सिमला मिरचीच्या दरात तेजी 

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आवठडाभरात दर दिवसाला एक हजार क्विटंलपेक्षा अधिक भाजीपाल्याची आवक झाली.
Rising prices of Nagar Shevaga, Simla Chili
Rising prices of Nagar Shevaga, Simla Chili

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आवठडाभरात दर दिवसाला एक हजार क्विटंलपेक्षा अधिक भाजीपाल्याची आवक झाली. आठवडाभर शेवगा, सिमला मिरचीला मागणी चांगली राहिली आणि दरातही तेजी होती. भुसारची आवक वाढू लागली असून दर दिवसाला एक हजार क्विंटलची आवक झाली.  नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेवग्याची १ हजार ते २ हजार क्विंटलची आवक होऊन १० हजार ते १२ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. सिमला मिरचीची १२४ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार ५०० रुपयाचा दर मिळाला. टोमॅटोची ११२ क्विंटलची आवक होऊन ८०० ते ४ हजार, वांगीची १८ ते २० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ५ हजार, फ्लॉवरची १०४ ते ११० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार, कोबीची १७ ते २० क्विंटलची आवक होऊन ७०० ते ३ हजार, काकडीची ३१ ते ३५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार, गवारची ३ ते ५ क्विटंलची आवक होऊन ४ हजार ते ९ हजार, घोसाळ्याची १ ते ३ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार, दोडक्याची ११ ते १५ क्विटंलची आवक होऊन २ हजार ते ५ हजार, कारल्याची १० ते १२ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार, भेंडीची १३ ते १५ क्विंटलची २ ते ५ हजार, हिरव्या मिरचीची १२४ ते १३० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार ५००, बटाट्याची १६५ के १७० क्विंटलची आवक होऊन ७०० ते १५०० रुपयाचा दर मिळाला.  मेथीच्या दरदिवसाला २ हजार ११५ जुड्याची आवक होऊन शंभर जुड्याला ३०० ते १५००, कोथिंबीरीच्या ४३५४ जुड्याची आवक होऊन २०० ते ११००, पालकच्या ५०० जुड्याची आवक होऊन ४०० ते १ हजार, शेपूच्या १६० जुड्याची आवक होऊन ३०० ते ४०० रुपयाचा दर मिळाला आहे. 

रोज हजार क्विंटल भुसारची आवक  नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसारची दर रोज साधारण १ हजार क्विंटलची आवक झाली. गावराण ज्वारीला २१०० पर्यत, बाजरीला १५०० ते २ हजारपर्यत, हरभऱ्याला ३९७५ ते ४५५१ पर्यत, मुगाला सहा हजारापर्यत, उडदाला ४ हजार ते ६ हजार ५०० पर्यत, मठाला ६४३१ पर्यत, गव्हाला १८६० ते २०५१ पर्यत, सोयाबीनला ४८०० ते ६४०० पर्यत दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

हिरवी मिरची, दोडका,  टोमॅटोच्या दरात सोलापुरात सुधारणा 

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात हिरवी मिरची, दोडका, टोमॅटोची आवक तुलनेने चांगली असूनही, मागणी असल्याने त्यांच्या दरातील वाढ या सप्ताहातही पुन्हा टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात हिरव्या मिरचीची रोज २० ते ४० क्विंटलपर्यंत आवक झाली. दोडक्याची पाच ते दहा क्विंटल आणि टोमॅटोची १०० ते २०० क्विंटलपर्यंत आवक झाली. त्यांच्या आवकेत चढ-उतार राहिला. पण मागणी असल्याने त्यांना उठाव मिळाला. या सर्व फळभाज्यांची आवक स्थानिक भागातूनच झाली. हिरव्या मिरचीला प्रति क्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, दोडक्याला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये, तर टोमॅटोला प्रति क्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला. त्या शिवाय वांगी, बटाटा, सिमला मिरची यांनाही पुन्हा उठाव मिळाला. त्यांचे दरही काहीसे स्थिर राहिले. बटाट्याला प्रति क्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १४०० रुपये आणि सर्वाधिक ७००० रुपये, वांग्याला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये तर सिमला मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्यामध्ये कोथिंबिर, मेथी, शेपूचे दर स्थिर राहिले. त्यांची आवक रोज प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यापर्यंत कायम होती. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ३०० ते ४०० रुपये, मेथीला ६०० ते ९०० रुपये आणि शेपूला ४०० ते ६०० रुपये, असा दर मिळाला. 

डाळिंबाचे दर टिकून  डाळिंबाच्या आवकेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत असला, तरी डाळिंबाच्या दरात बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. डाळिंबाची आवक सांगोला, मंगळवेढा, माढा, माळशिरस भागातून झाली. डाळिंबाची आवक प्रति दिन अर्धा ते एक टनापर्यंत राहिली. डाळिंबाला प्रति क्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ११ हजार ५०० रुपये, असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.      उडदाची आवक कायम;  सोयाबीन सहा हजाराच्या पुढेच 

लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाची कमी अधिक प्रमाणात आवक कायम आहे. उडदाप्रमाणेच हरभरा, सोयाबीन व गव्हाच्या आवकेतही चढ-उतार पहायला मिळत असून, सोयाबीनचे सरासरी दर मात्र सहा हजार रुपये प्रति क्‍विंटल पुढेच असल्याचे चित्र आहे.  लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन, तूर, मूग, उडदाची आगार मानली जाते. या बाजार समितीमध्ये २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान उडदाची एकूण ६०८९ क्‍विंटल आवक झाली. ८३९ ते १४०२ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक आवक झालेल्या या उडदाला कमीत कमी ३५०० ते ७५०० रुपये प्रति क्‍विंटल दरम्यान दर मिळाला. हरभऱ्याची एकूण आवक ५५३७ क्‍विंटल झाली. ७४७ ते १४७२ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या हरभऱ्याला कमीत कमी ३५०० तर जास्तीत जास्त ५००० रुपये प्रति क्‍विंटल दरम्यान दर मिळाला. लातूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक ही सोयाबीनची झाली. ९६०३ ते १२३०३ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात मिळून ५३ हजार ७८१ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला कमीत कमी ५७५० तर जास्तीत जास्त ७०७३ रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. सोयाबीनचे सरासरी दर ६२०५ ते ६५०० रूपये प्रति क्‍विंटल दरम्यान राहिले. गव्हाची एकूण आवक ६७४० क्‍विंटल झाली. ६७४० क्‍विंटल झाली. ८२४ ते १७५६ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक आवक झालेल्या गव्हाचे कमीत कमी दर १७५० तर जास्त जास्त दर २४०० रुपये प्रति क्‍विंटल राहिले. गव्हाला सरासरी १८५० ते २२०० रुपये प्रति क्‍विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक, दर स्थिर 

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक १२१ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रति क्विंटल २,५०० ते ४,५०० रुपये तर सरासरी दर ३,५०० रुपये मिळाला. परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.         चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक ५,३९८ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ७०० ते २,५०० मिळाला तर सरासरी दर १,५०० रुपये राहिला. लाल कांद्याची आवक ६१५ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ६०० ते १,५०० मिळाला तर सरासरी दर १,००० रुपये राहिला. बटाट्याची आवक ५,७३७ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ६०० ते १,८०० तर सरासरी दर १,१०० रुपये राहिला.  लसणाची आवक २३० क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल २,५०० ते ७,५०० तर सरासरी दर ४,५०० रुपये राहिला. आद्रकची आवक ३४४ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल १,२०० ते २,२०० तर सरासरी दर १,७०० रुपये राहिला.         सप्ताहात फळभाज्यांची आवक सर्वसाधारण असून दर स्थिर आहेत. वालपापडी-घेवड्याची आवक ५,२२० क्विंटल झाली. वालपापडीला प्रति क्विंटल ३,००० ते ४,५०० असा तर सरासरी दर ३,७०० रुपये राहिला. घेवड्याला प्रति क्विंटल ३,००० ते ६,००० तर सरासरी दर ४,७०० रुपये राहिला. गाजराची आवक १,३६२ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ५,००० ते ६,००० तर सरासरी दर ५,५०० रुपये राहिला.          फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १५० ते १,००० तर  सरासरी ६५०, वांगी ३५० ते ७५० तर सरासरी ५५० व फ्लॉवर १०० ते २०५ सरासरी १२५  रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १७०  ते ३५० तर सरासरी २५५ रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ५०० ते ८२५ तर सरासरी दर ७०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १४० ते ३०० तर सरासरी २५०, कारले २५० ते ३२७  तर सरासरी ३००, गिलके ३५० ते ४०० तर सरासरी ३८५ व दोडका २०० ते ३५० तर सरासरी दर २३५ रुपये, असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक १,२२० क्विंटल झाली. तिला प्रति क्विंटल ८५० ते १,२५० तर सरासरी दर १,००० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक २,१४४ क्विंटल झाली. मृदुला वाणास प्रति क्विंटल ४५० ते १,०००० तर सरासरी ७,५०० दर मिळाला. 

भाजील्याचे दर असे  पालेभाजी...किमान...कमाल...सरासरी  गावठी कोथिंबीर...५००...२,०००...१,०००  हायब्रीड कोथिंबीर...४००...५,०००...३,०००  मेथी...१,५००...३,०००...२,२००  शेपू...३,०००...४,०००...३,५००  कांदापात...२,०००...४,०००...३,००० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com