बटाटा वाणाचे भाव तेजीत 

बाजार समितीच्या आवारात मराठवाडा भागातील शेतकऱ्यांची बटाटा वाण खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे. त्यातच पंजाब राज्यातून बटाटा वाणाची पुरेशा प्रमाणात आवक होत नाही. त्यामुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून बटाटा वाणाच्या भावात प्रति क्विंटलमागे एक हजार १०० रुपयांची वाढ झाली.
बटाटा वाणाचे भाव तेजीत  Rising prices of potato varieties
बटाटा वाणाचे भाव तेजीत  Rising prices of potato varieties

मंचर, जि. पुणे : बाजार समितीच्या आवारात मराठवाडा भागातील शेतकऱ्यांची बटाटा वाण खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे. त्यातच पंजाब राज्यातून बटाटा वाणाची पुरेशा प्रमाणात आवक होत नाही. त्यामुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून बटाटा वाणाच्या भावात प्रति क्विंटलमागे एक हजार १०० रुपयांची वाढ झाली. मंगळवारी (ता.१९) २ हजार ६०० रुपये प्रती क्विंटल भावाने शेतकऱ्यांनी बटाटा वाणाची खरेदी  केली.  आडते सागर थोरात म्हणाले, ‘‘गेल्या आठवड्यात एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुखराज गोळी बटाटा वाणांचे बाजारभाव होते. मराठवाड्यात मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. नगदी पैसे मिळवून देणाऱ्या बटाटा लागवडीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे उस्मानाबाद, बीड, लातूर, औरंगाबाद भागातील शेतकरी बटाटा वाण खरेदीसाठी येथे आले आहेत.’’ आडते संजय मोरे म्हणाले, ‘‘पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात या भागात बटाटा वाण तयार करण्याऐवजी अनेक शेतकऱ्यांचा खाण्याच्या बटाट्याचे उत्पादन घेण्यावर भर आहे. त्यामुळे बटाटा वाणाचे प्रमाण घटले आहे. मागणी करूनही बटाटा वाण पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. परिणामी बटाटा वाण अजून तेजीकडे जाण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया बाजार समितीच्या आवारात २१ आडत्यामार्फत बटाटा वाण विक्री सुरु आहे. राज्यात बटाटा वाण विक्रीसाठी मंचरची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. गेल्या २१ ऑगस्ट ते १८ ऑक्टोबर या काळात ३१ हजार २५ क्विंटल, तर मंगळवारी (ता. १९) एक हजार ४८७ क्विंटल बटाटा वाणाची आवक झाली. आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर व मावळ तालुक्यातही बटाटा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

- देवदत्त निकम, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com