Agriculture News in Marathi Rising prices of potato varieties | Page 3 ||| Agrowon

बटाटा वाणाचे भाव तेजीत 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

बाजार समितीच्या आवारात मराठवाडा भागातील शेतकऱ्यांची बटाटा वाण खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे. त्यातच पंजाब राज्यातून बटाटा वाणाची पुरेशा प्रमाणात आवक होत नाही. त्यामुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून बटाटा वाणाच्या भावात प्रति क्विंटलमागे एक हजार १०० रुपयांची वाढ झाली.

मंचर, जि. पुणे : बाजार समितीच्या आवारात मराठवाडा भागातील शेतकऱ्यांची बटाटा वाण खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे. त्यातच पंजाब राज्यातून बटाटा वाणाची पुरेशा प्रमाणात आवक होत नाही. त्यामुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून बटाटा वाणाच्या भावात प्रति क्विंटलमागे एक हजार १०० रुपयांची वाढ झाली. मंगळवारी (ता.१९) २ हजार ६०० रुपये प्रती क्विंटल भावाने शेतकऱ्यांनी बटाटा वाणाची खरेदी 
केली. 

आडते सागर थोरात म्हणाले, ‘‘गेल्या आठवड्यात एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुखराज गोळी बटाटा वाणांचे बाजारभाव होते. मराठवाड्यात मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. नगदी पैसे मिळवून देणाऱ्या बटाटा लागवडीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे उस्मानाबाद, बीड, लातूर, औरंगाबाद भागातील शेतकरी बटाटा वाण खरेदीसाठी येथे आले आहेत.’’

आडते संजय मोरे म्हणाले, ‘‘पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात या भागात बटाटा वाण तयार करण्याऐवजी अनेक शेतकऱ्यांचा खाण्याच्या बटाट्याचे उत्पादन घेण्यावर भर आहे. त्यामुळे बटाटा वाणाचे प्रमाण घटले आहे. मागणी करूनही बटाटा वाण पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. परिणामी बटाटा वाण अजून तेजीकडे जाण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया
बाजार समितीच्या आवारात २१ आडत्यामार्फत बटाटा वाण विक्री सुरु आहे.
राज्यात बटाटा वाण विक्रीसाठी मंचरची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. गेल्या २१ ऑगस्ट ते १८ ऑक्टोबर या काळात ३१ हजार २५ क्विंटल, तर मंगळवारी (ता. १९) एक हजार ४८७ क्विंटल बटाटा वाणाची आवक झाली. आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर व मावळ तालुक्यातही बटाटा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

- देवदत्त निकम, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर


इतर बातम्या
माण तालुक्यात द्राक्ष शेतीचे पावसामुळे...कुकुडवाड, जि. सातारा : मागील आठवड्यात सलग आठवडाभर...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
‘इटियाडोह’च्या पाण्यासाठी बेमुदत...गोंदिया ः रब्बीत २४ किलोमीटरपर्यंत इटियाडोह...
काटेपूर्णा प्रकल्पावरून रब्बीसाठी पाणी...अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून या...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यातनांदेड : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सतत...
हर्षवर्धन पाटलांच्या धरणे आंदोलनाची...इंदापूर, जि. पुणे ः भाजप नेते हर्षवर्धन पाटील...
पुणे बाजार समितीत ‘डमी’ अडत्यांचा...पुणे ः बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ...
नगरमध्ये कोथिंबीर, मेथीची आवक वाढलीनगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
शासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून...नाशिक: ग्रामीण भागात विविध योजना व संकल्पनांची...
ई- पीकपाहणीत जळगाव अव्वल ! जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा...
कव्हेतील डाळिंब बागेची सोलापूर डाळिंब... सोलापूर ः माढा तालुक्यातील कव्हे (ता.माढा)...
 खानदेशात रब्बीची ४० टक्के पेरणी जळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ...सोलापूर ः राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून...अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली...