Agriculture news in marathi The risk of bird flu has increased in the country | Agrowon

देशात बर्ड फ्लूत वाढ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जानेवारी 2021

देशात बर्ड फ्लूच्‍या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. कावळे, स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू होण्‍याच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. केरळ, हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

नवी दिल्ली : देशात बर्ड फ्लूच्‍या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. कावळे, स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू होण्‍याच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. केरळ, हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात या घटनांमध्ये वाढ झाली आहे.  संबंधित राज्यांना सतर्क करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संबंधित राज्यांशी संपर्क साधून सूचना देण्यात येत आहेत. वन विभागांना वनांच्या प्रदेशात होणाऱ्या पक्ष्‍यांच्या स्थलांतरावर बारकाईने लक्ष्य ठेवण्‍याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण (एनडीएमए) विभागाने शुक्रवारी (ता. ८) राज्य सरकारचे आरोग्य अधिकारी, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आहे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या पथकाने शुक्रवारी केरळमधील कोट्यायम जिल्ह्यात संसर्ग झालेल्या ठिकाणी भेट दिली. केरळमध्ये एकूण ५० हजार ९३५ पक्षी मारून टाकले आहेत. मध्य प्रदेशातील  इंदौर, गुना, आग्रा, देवास, खांडवा या भागात संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेश सरकारने चिकनच्या व्यापारावर बंदी घातली आहे.

जम्मू आणि काश्मीर सरकारने १४ जानेवारीपर्यंत राज्यात चिकनच्या आयातीवर बंदी घातली आहे. उत्तराखंडमध्ये सहा कावळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. कर्नाटकमध्येही दक्षिण कर्नाटक जिल्ह्यांत  कावळ्यांचा मृत्यू झाला असून, नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...