agriculture news in Marathi, rita teaotia Says, Organic production is less in country , Maharashtra | Agrowon

देशात सेंद्रिय उत्पादन कमीच ः रीता टेओटिया

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

काही शेती उत्पादने नैसर्गिकरित्या सेंद्रिय असतात. परंतु प्रमाणित नसतात. उदा. ईशान्य भारतात शेतकरी उत्पादन घेताना रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. त्यांचे उत्पादन हे सेंद्रिय आहे. परंतु, ग्राहकांच्या दृष्टीने विचार करता विशिष्ट पातळीवरील प्रमाणपत्र आवश्‍यक असते.
- रीता टेओटिया, अध्यक्षा, एफएसएसएआय

पणजी: देशात सेंद्रिय उत्पादनांना ग्राहक वाढला असला तरीही उत्पादन मात्र कमीच आहे. या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रिय कृषी मंत्रालयाने सहभागी हमी योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे सेंद्रिय उत्पादन वाढेल, असे भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानके प्राधिकरणच्या (एफएसएसएआय) अध्यक्षा रीता टेओटिया म्हणाल्या.

सहभागी हमी योजना (पीजीएस) ही सेंद्रिय उत्पादनांना प्रमाणित करण्याची पध्दत आहे. कृषी उत्पादन करताना प्रमाणित मानके आणि आवश्‍यक गुणवत्ता राखली गेली त्या उत्पादनांना प्रमाणित करण्यात येते. हे लोगो किंवा स्टेटमेंटच्या स्वरूपात प्रदर्शित करण्यात येते. ‘‘देशात प्रमाणित सेंद्रिय अन्न उत्पादनाचे प्रमाणे खूपच कमी आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘पीजीएस’ योजनेमुळे सेंद्रिय उत्पादन घेणारे शेतकरी एकत्र येतील त्यांचा गट तयार होईल यामुळे त्यांचा उत्पादन खर्चही कमी होईल. यामुळे सेंद्रिय उत्पादनालाही चालना मिळेल. ‘एफएसएसएआय’च्या माध्यमातून देशात सेंय उत्पादनाखालील क्षेत्रात वाढ होईल,’’ असे टेओटीया यांनी सांगितले.  

‘एफएसएसएआय’ करत असलेल्या अन्न चाचणीविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘तीन चतुर्थांश नमुने हे खाण्यासाठी अयोग्य आढळले आहेत.’’


इतर ताज्या घडामोडी
पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा...मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा...
बुलडाण्यात जिल्हाधिकारी चंद्रा यांनी...बुलडाणा  ः कृषी विभागामार्फत जिल्ह्यात...
आंबा, काजू क्लस्टरसाठी रत्नागिरी,...रत्नागिरी : विविध देशांमधील आंबा, काजूची निर्यात...
बदलत्या हवामानाचा गव्हाला फटकाअमळनेर, जि. जळगाव  : तालुक्‍यात गहू पिकाची...
भंडारा जिल्ह्यात धान विक्रीचे १११...भंडारा  ः शासनाने हमीभावात बोनसच्या...
लाल कंधारी, देवणी गोवंश संवर्धनासाठी...परभणी  ः मराठवाडा विभागातील लाल कंधारी आणि...
गोंदिया जिल्ह्यात भरडाईच्या...गोंदिया  ः भरडाईसाठी धानाची उचल होण्याची गती...
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...
पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार...पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप...नगर  : ‘‘केंद्रीय अन्न व नागरी...
नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार...नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता...
अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून...नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला...पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत...
अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी...पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द...सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...
कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले...बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या...