agriculture news in Marathi river level increased in Kolhapur Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी सर्व नद्यांचे पाणी कमी होणार याबाबतचा पाटबंधारे विभागाने व्यक्त केलेला अंदाज चुकल्याने रविवारी (ता.२५) दुपारपर्यंत पूरग्रस्त शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी वाढतच होते.

कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी सर्व नद्यांचे पाणी कमी होणार याबाबतचा पाटबंधारे विभागाने व्यक्त केलेला अंदाज चुकल्याने रविवारी (ता.२५) दुपारपर्यंत पूरग्रस्त शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी वाढतच होते. यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली. पाणी कमी होत नसल्याने ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. परंतु रविवारी दुपारपर्यंत पाणी वाढत असल्याने पूरग्रस्त भागात घबराहट होती. 

पंचगंगा नदीचे पाणी गतीने ओसरले, परंतु कृष्णा व वारणा या नद्यांचे पाणी दुपारपर्यंत वाढतच होते. यामुळे अनेक गावे पुराच्या दहशतीच्या वातावरणातच राहिली. अर्ध्या अर्ध्या तासाला एक इंच पाणी वाढू लागल्याने स्थलांतर करावे की न करावे या संभ्रमात नागरिक राहिले. पाटबंधारे विभागाने शनिवार सायंकाळपासून पाणी ओसरू लागेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार ग्रामस्थ निश्‍चिंत होते. परंतु रविवारी मध्यरात्रीही पाणी वाढू लागल्याने अस्वस्थता पसरली. अंदाज चुकल्याने २००५ व २०१९ ची पूरस्थिती परत येते की काय? अशी शंका येऊ लागल्याने पुन्हा घबराहट पसरली. कोयना धरणातून ३० हजार, तर वारणा धरणातून ८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणीपातळी अपेक्षेप्रमाणे कमी झाली नाही. 

पावसाचा जोर ओसरला 
पावसाचा जोर कमी झाल्याने वाहतुकीसह अन्य व्यवहार पूर्ववत होत आहेत. पुणे-बंगळूर महामार्ग सुरू करण्यासाठी रविवारी दुपारपर्यंत प्रशासनाच्या हालचाली सुरू होत्या. अद्याप बस सेवा सुरू झाली नाही. एनडीआरएफच्या जवानांकडून करवीर व शिरोळ तालुक्यांत बचावकार्य वेगाने सुरू झाले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे असणारे राधानगरी धरण ही आता भरण्याच्या अंतिम टप्प्यात आले आहे. कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून त्यातून भोगावती नदी पात्रात विसर्ग होऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 


इतर अॅग्रो विशेष
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...