agriculture news in marathi, river plowing for water conservation, amaravati, maharashtra | Agrowon

पाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा प्रयोग
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

नाला खोलीकरण, नदी नांगरुन घेतली तर प्रवाह थांबतो आणि त्यामुळे पाणी जमिनीत मुरते. थर पूर्णा, चंद्रभागा नद्यांमध्ये पहिल्या टप्प्यात हा प्रयोग केला आहे. अचलपूर, तिवसा या तालुक्‍यांत ही कामे होतील. त्यामुळे रिचार्ज होण्याची शक्‍यता आहे. पूर नियंत्रणाचा उद्देशही साधला जाणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांचेही या उपक्रमाला सहकार्य मिळाले आहे. 
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती.

अमरावती  ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी, याकरिता जिल्ह्यात नदी नांगरण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. अचलपूर व तिवसा तालुक्‍यांत पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प राबविण्यात येत असून त्याचे परिणाम अनुभवल्यानंतर पुढीलवर्षी सर्वच नद्या नांगरण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे.

जिल्ह्यात जलयुक्‍त शिवार अभियानूान नदी, नाले खोलीकरण व रुंदीकरणाची कामे होत आहेत. याच अभियानाअंतर्गत अचलपूर तालुक्‍यात नदी नांगरण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आले. नदीमध्ये पाणी आल्यानंतर ते प्रवाहीत होत असताना नांगरलेल्या भागातून अधिक प्रमाणात मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास यामुळे मदत होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. त्याकरिता नदीच्या दोन्ही काठा दरम्यानचा भाग सखोल नांगरला जात आहे. यामुळे पाणी पातळी वाढून पाणीसंकट दूर होण्यास मदत होईल. त्यासोबतच नदीकाठच्या गावांना पुराचा धोकाही कमी राहील. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी वाहून जाण्याचे प्रमाण अधिक आहे किंवा पुराचा धोका जास्त आहे, अशा नदीपात्रात नदी नांगरण्याची कामे तत्काळ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी राजूरा शिवार, नारायणपूर परिसरातील जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. या ठिकाणी सिमेंट नाला बांध घेण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे १३९ हेक्‍टर जमिनीला फायदा होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. नदी नांगरण्याचा हा प्रयोग कितपत यशस्वी होतो. त्यावरुन त्याच्या पुढील वर्षीच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला जाणार आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...