agriculture news in marathi, river water level rises in overflow dams | Agrowon

ओव्हर फ्लो धरणांमुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

पुणे : उत्तर महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र आहे. यामुळे राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असून कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दोन-तीन दिवसांच्या पावसामुळे या भागातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.  

गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने जोर धरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात बहुतांशी, तर पूर्व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. 

पुणे : उत्तर महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र आहे. यामुळे राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असून कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दोन-तीन दिवसांच्या पावसामुळे या भागातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.  

गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने जोर धरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात बहुतांशी, तर पूर्व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. 

कोकणातील वसई येथे सर्वाधिक २७० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मुंबई, बेलापूर, माथेरान, पनवेल येथेही मुसळधार पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे सर्वाधिक पाऊस पडला. तर गगनबावडा, राधानगरी, चांदगड, गारगोटी, भुदरगड, पाटण येथेही जोरदार पाऊस पडला. तसेच कोयना, ताम्हिणी, डुंगरवाडी, शिरगाव, दावडी, भिरा या घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस पडला. यामुळे कोयना, पवना, खडकवासला, भामाआसखेड, वरसगाव, वडीवळे, निरा देवधर, वीर, भाटघर अशा महत्त्वाच्या काही धरणांतून पाण्याचा विसर्स सोडण्यात आल्याने नद्यांना पूर आला आहे.  

मराठवाड्यातील बहुतांशी भागांत पावसाच्या सरी बरसल्या आहेत. जाफ्राबाद येथे सर्वाधिक ५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर भोकरदन, पाथरी, वाशी, अहमदपूर, आष्टी, आंबाजोगाई, औसा, भूम, धारूर, घनसांगवी, कन्नड, परांडा, परळी वैजनाथ, फुलब्री, सेनगाव, सोयगाव, तुळजापूर, उमरगा, वैजापूर येथेही हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. विदर्भातही पावसाच्या काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक १६० मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर शिंदेवाही, धरणी, साओली, सेलू, आष्टी, आर्वी, चामोर्शी, कुरखेडा, मोर्शी, कुही येथेही जोरदार पाऊस पडला असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळत आहे.
 

धरणनिहाय सोडण्यात आलेला विसर्ग (गुरुवार, ता.५)
धरण   विसर्ग (क्युसेकमध्ये)   नदी
उजनी    ४०,०००    भीमा
खडकवासला   ७७०४   मुठा  
कोयना   ७०४०४   कोयना
राधानगरी   ८०००    पंचगंगा
कासारसाई   ४००   इंद्रायणी
पवना   २२०८   मुळा-मुठा
मुळशी   १५,४००  मुळा-मुठा  
वीर   १३,९६१  मुळा-मुठा
वरसगाव   ४४४०   मुळा-मुठा 

गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत हवामान विभाग)  
कोकण ः
वसई २७०, मुंबई २४०, बेलापूर २२०, माथेरान २००, पनवेल १९०, ठाणे १८०, रोहा १६०, कर्जत १५०, हर्णे, खेड, पोलादपूर, सुधागडपाली १४०, अलिबाग, काणकवली, सावंतवाडी १३०, भिरा, मंडणगड, पालघर, संगमेश्वर, देवरूख, तलासरी १२०, माणगाव, पेण, वैभववाडी ११०, खालापूर, म्हसळा, राजापूर, श्रीवर्धन, उल्हासनगर, उरण, वाडा १००, दोडामार्ग, गुहागर, मुरूड ९०, डहाणू, कुडाळ, पेडणे ८०, अंबरनाथ, भिवंडी, देवगड, कल्याण, रत्नागिरी ७०, जव्हार, महाड ६०, मडगाव, फोंडा, रामेश्वरी, सांगे, वेगुर्ला ५०, कानकोन , केपे ४०, मोखेडा, शहापूर, विक्रमगड ३०, मालवण, मुरबाड २०.

मध्य महाराष्ट्र ः महाबळेश्वर १९०, गगनबावडा, राधानगरी १००, चांदगड ७०, गारगोटी, भुदरगड, पाटण ६०, आजरा, जावळीमेधा, ओझरखेडा, पौंड, मुळशी, सुरगाना ५०, इगतपुरी ४०, नगर, चांदव़ड, पन्हाळा, वाई ३०, बार्शी, भोर, गडहिंग्लज, नांदगाव, निफाड, सातारा, सटाणा, बागलाण, शाहूवाडी, शिराळा, शिरपूर २०.
मराठवाडा ः जाफ्राबाद ५०, भोकरदन, पाथरी, वाशी ३०, अहमदपूर, आष्टी २०, आंबाजोगाई, औसा, भूम, धारूर, घनसांगवी, कन्नड, परांडा, परळी वैजनाथ, फुलब्री, सेनगाव, सोयगाव, तुळजापूर, उमरगा, वैजापूर १०.

विदर्भ ः गडचिरोली १६०, शिंदेवाही १२०, धरणी, साओली, सेलू ९०, आष्टी ८०, आर्वी, चामोर्शी, कुरखेडा, मोर्शी ७०, कुही ६०, चिखलदरा, एटापल्ली, खारंघा, मौदा, समुद्रपूर ५०, चिमूर, नागभिड, वर्धा ४०, आरमोरी, चांदूरबाजार, मूल, रामटेक, तिवसा, वरूड ३०.

घाटमाथा ः कोयना (पोफळी २१०), ताम्हिणी १९०, डुंगरवाडी १४०, शिरगाव, दावडी, भिरा १२०, लोणावळा, कोयना (नवजा), खोपोली ९०, अंबोणे ८०, लोणावळा, वळवण ७०, शिरोटा, भिवपुरी ५०, खंद ४०.

इतर अॅग्रो विशेष
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...
कृषी निर्यातीला धोरणात्मक पाठबळ हवे :...जागतिक स्तरावर कृषी निर्यातीत भरपूर संधी आहे,...
शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त...देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर...
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात...सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी...
२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८...पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते....
कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटातसांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही....
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घटसोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...