agriculture news in marathi Rivers and villages flooded in Ratnagiri district | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर, गावे जलमय

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला दणका दिला. नद्यांना आलेल्या पुरामुळे किनारी भाग जलमय झाले. जगबुडी, बावनदी, अर्जुना, काजळी, वाशिष्ठी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती.

रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जिल्ह्याला दणका दिला. नद्यांना आलेल्या पुरामुळे किनारी भाग जलमय झाले. जगबुडी, बावनदी, अर्जुना, काजळी, वाशिष्ठी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. पावसाचा जोर दिवसभर सुरूचं होता. चांदेराई, सोमेश्‍वर, माखजन भागात पुराचे पाणी शिरल्यामुळे घरेच्या घरे पाण्याखाली गेली होती.

बुधवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी पाऊस ८७.६८ मिमी इतका नोंदला गेला. त्यात मंडणगड ९२.३० मिमी, दापोली ४५.०० मिमी, खेड ५४.८० मिमी, गुहागर ९४.७० मिमी, चिपळूण ९६.४० मिमी, संगमेश्वर १३२.७० मिमी, रत्नागिरी ११२.५० मिमी, राजापूर ८२.९० मिमी, लांजा ७७.८० मिमी पाऊस झाला. १ जूनपासून आत्तापर्यंत जिल्ह्यात १६०३.३६ मिलिमीटर पाऊस झाला.

रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर सलग तिसऱ्या दिवशीही वाढतच आहे. पावसाबरोबरच वेगवान वाऱ्यांनी अनेक ठिकाणी पडझड झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात दाणादाण उडाली असून नदीकिनारी भाग जलमय झाले आहेत. रायगडपासून रत्नागिरी, सिंधुदुर्गापर्यंत पावसाचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील भारजा, जगबुडी, वाशिष्ठी, सावित्री, बावनदी आणि काजळीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जवळच्या गावात पाणी शिरले. मुंबई गोवा महामार्गावरील बावनदी, आंजणारी आणि राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवरील पूल मंगळवारी दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीने कालपासूनच धोक्याची पातळी ओलांडली होती. पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठेबरोबरच परिसरातील घरांमध्ये घुसले. अर्धी अधिक घरे पाण्याखाली गेली होती. पुराच्या शक्यतेमुळे ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले होते. चांदेराईबरोबरच सोमेश्‍वर मोहल्ल्यात काजळीच्या पुराचे पाणी घुसल्याने तेथील लोकांचे नुकसान झाले आहे. या नदीची नियमित पातळी १६.५० मीटर असून पावसामुळे ती १७.५० मीटर इतकी होती.

बावनदीला आलेल्या पुराचे पाणी वांद्री बाजारपेठेत शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती. येथील ग्रामदेवता मंदिराला पाणी टेकले होते. पाण्याचा जोर वाढत असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले. बावनदी ते पाली हा रस्ता बंद झाल्यामुळे वेळवंड, निवळी शेल्टी भागाचा मुख्य मार्गाशी संपर्क तुटला होता. या भागातील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली होती. पूर असाच राहिला तर भातशेतीला फटका बसण्याची शक्यता आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...